पुणे हादरलं! क्षुल्लक कारणावरुन टॅक्सीचालकानं आयटी अभियंत्याचा काढला काटा

पुणे हादरलं! क्षुल्लक कारणावरुन टॅक्सीचालकानं आयटी अभियंत्याचा काढला काटा

Pune Crime : पुण्यात एका आयटी अभियंत्याची (IT Engineer)तीन हजार रुपयांवरुन हत्या (Crime) केल्याची माहिती समोर आली आहे. ही हत्या एका टॅक्सीचालकाने (taxi driver)आपल्या साथीदाराच्या सहकार्याने केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पोलिसांनी या अवघ्या 24 तासांतच या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अल्पवयीन मुलं केक कापतानाच पोलिसांनी त्यांना ‘धू धू धुतले’… पुण्यात घडला प्रकार

घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, वाघोलीमधील मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी या अभियंत्याची हत्या करण्यात आली. लोणीकंद पोलिसांनी अवघ्या 24 तासातच मारेकऱ्यांना अटक केली आहे. गौरव सुरेश उदाशी (वय 35) असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. टॅक्सीचालक भगवान केंद्रे (उस्मानाबाद) आणि अमोल मानकर (वाशिम) असे अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

आरोपी भगवान केंद्रे याच्याकडे चारचाकी वाहन आहे. तो अॅप आधारित टॅक्सी सर्विस पुरवतो. यातूनच भगवान आणि गौरवची ओळख झाली होती. गौरवने भगवानच्या टॅक्सीमधून यापूर्वी प्रवासही केला होता. त्याची तीन हजार रुपयांची उधारी गौरवकडे होती. ते पैसे परत न दिल्यानेच भगवान आणि त्याच्या साथीदाराने गौरवची हत्या केल्याचं तपासात समोर आलं आहे.

पुण्यात काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरुन खुन आणि हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यातच अनेक गॅंगही सक्रिय झाल्याचे दिसून आले. काही दिवसांपूर्वी रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणाने भाई न म्हटल्याने एका टोळक्याने त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. त्या तरुणाच्या डोक्यात रॉड मारुन त्याला जखमी केले होते. ही घटना पुण्यातील येरवडा परिसरातील खडकीमध्ये घडली होती.

पुण्यात गुन्हेगारीमध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्यान अनेक टोळ्या सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. पुण्यात कोयता गँगने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पुण्यातील अनेक परिसरामध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. पुण्यातील अशा वाढणाऱ्या गुन्हेगारीला आणि वाढत्या टोळ्यांना आवर घालण्याचे तगडे आव्हानच पुणे पोलिसांसमोर आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube