Download App

उबाठाला पुन्हा एकदा ‘दे धक्का’; कोल्हापूरमध्ये सुजित मिणचेकरांचा शिवसेनेत प्रवेश

उबाठाचे Sujit Minchekar आणि मनसेचे गजानन जाधव शिंदे यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला

  • Written By: Last Updated:

UBT Sujit Minchekar entered in Shivsena : सध्या शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरच्या अंतर्गत जोरदार इनकमिंग सुरू आहे. त्यात आता शिवसेनेने कोल्हापूरमध्ये ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. एका माजी आमदाराला शिवसेनेने गळाला लावले आहे.

राहुल गांधींची अवस्था वाघ नव्हे माजंरासारखी, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

उबाठा गटाचे हातकणंगले मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि मनसेचे हातकणंगलेचे जिल्हाप्रमुख गजानन जाधव यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

फिक्स्ड डिपॉझिट ते एलपीजी गॅस…1 मार्चपासून ‘हे’ मोठे बदल होणार, परिणाम थेट खिश्यावर

डॉ. सुजित मिणचेकर आणि गजानन जाधव यांच्या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला अधिक बळकटी मिळणार असून पक्ष अधिक भक्कम होणार असल्याचे मत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीत या लोकसभेत खासदार धैर्यशील माने हे प्रचंड मतांनी विजयी झाले होते. तर विधानसभा निवडणुकीत येथे महायुतीचे 10 पैकी 10 आमदार विजयी झाले.

त्यानंतर असाच विजय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मिळावा यासाठी डॉ. मिणचेकर, गजानन जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी नक्की प्रयत्न करतील असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख रवींद्र माने आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

follow us