फिक्स्ड डिपॉझिट ते एलपीजी गॅस…1 मार्चपासून ‘हे’ मोठे बदल होणार, परिणाम थेट खिश्यावर

फिक्स्ड डिपॉझिट ते एलपीजी गॅस…1 मार्चपासून ‘हे’ मोठे बदल होणार, परिणाम थेट खिश्यावर

From Fixed Deposits To LPG Gas Changes from 1 March : फेब्रुवारी महिना संपत आलाय. मार्च महिना सुरू होण्यास फक्त एक दिवस शिल्लक आहे. नवीन महिन्याच्या सुरुवातीपासून अनेक नियम बदलतात. त्याचप्रमाणे 1 मार्च 2025 पासून (1 March) अनेक मोठे नियम बदलणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ (fixed deposits) शकतो. तर मग कोणते बदल (LPG gas) होत आहेत, ते आपण सविस्तर पाहू या.

15 एप्रिलची डेडलाईन ते कॅमेरे…; पुण्यात शिवशाहीत बलात्कार होताच प्रताप सरनाईक अॅक्शन मोडमध्ये

फिक्स्ड डिपॉझिट
अनेकजण गुंतवणुकीसाठी फिक्स्ड डिपॉझिटचा पर्याय निवडतात. जर तुम्हीही कष्टाचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी फिक्स्ड डिपॉझिट (FD) मध्ये गुंतवणूक करतात, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मार्च 2025 पासून बँक एफडीच्या नियमांमध्ये काही मोठे बदल करण्यात आले आहेत. हे नवीन नियम केवळ तुमच्या रिटर्नवरच परिणाम करत नाहीत, तर तुमच्या कर आणि पैसे काढण्याच्या पद्धतींवरही परिणाम करू शकतात. म्हणूनच, जर तुम्ही भविष्यात एफडी करण्याचा विचार करत असाल तर हे बदल समजून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

महायुतीत शिंदेंचा गेम? मुंबई मेट्रो भ्रष्टाचार अन् ‘त्या’ महत्त्वाच्या निर्णयांची चौकशी, भाजपचा नवा डाव..

एफडीवरील व्याजदरात बदल
मार्च 2025 पासून बँकांनी एफडीवरील व्याजदरात काही बदल केले आहेत. व्याजदर वाढू किंवा कमी होऊ शकतात, आता बँका त्यांच्या तरलता आणि आर्थिक गरजांनुसार व्याजदरांमध्ये लवचिकता ठेवू शकतात. लहान गुंतवणूकदारांवर, विशेषतः ज्यांनी 5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी एफडी केली आहे, त्यांच्यावर नवीन दरांचा परिणाम होऊ शकतो. लहान गुंतवणूकदारांवर परिणाम: ज्यांनी 5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी एफडी केली आहे, त्यांच्यावर नवीन दरांचा परिणाम होऊ शकतो.

एलपीजी किंमत
तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतींचा आढावा घेतात. अशा परिस्थितीत 1 मार्च 2025 रोजी सकाळी तुम्हाला सिलिंडरच्या किमतीत बदल दिसू शकतो. सुधारित किंमती सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जाऊ शकतात. दर महिन्याच्या 1 तारखेला तेल कंपन्या विमान इंधन म्हणजेच एअर टर्बाइन फ्युएल (एटीएफ) आणि सीएनजी-पीएनजीच्या किमती देखील बदलतात.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube