Download App

खासदार Sanjay Raut आज नाशिक दौऱ्यावर; काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

  • Written By: Last Updated:

नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) हे आज नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. राऊत यांच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. शिवसेना प्रमुख ( Nashik Shivsena ) पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संजय राऊत संवाद साधणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik) शहरात अनेक राजकीय नेत्याने दौरे केले आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) नाशिकला गेले होते. नाशिक हे राजकीय नेते मंडळींसाठी चर्चेचे ठिकाण बनले आहे. अनेक राजकीय पक्षांच्या बैठका याठिकाणी होऊ लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी भाजप कार्यकारिणीची बैठक नाशिकमध्ये पार पडली. यातच आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) नाशिकला येत आहेत. त्यामुळं राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला खासदार राऊत हजेरी लावणार आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित राहणार आहे. यावेळी राऊत यांचे भाषण नक्की होणार व या भाषणात ते कुणावर टीकेचे बाण सोडणार हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.

यापूर्वी संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आलेले असतांना शिंदे गटाने मोठी चाल खेळली आहे. ठाकरे मुंबईत पोहचत नाही तोच शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

Maharashtra Politics; पहाटेचा शपथविधी : पवार आणि अजितदादा यांच्यात काय सं’वाद’ झाला होता?

नाशिक बनतोय राजकारणाचा केंद्रबिंदू
राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या मोठं मोठ्या घडामोडींसाठी सध्या नाशिक हे केंद्रबिंदू बनू लागले आहे. गेल्या आठवड्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी देखील नाशिक दौरा केला होता. त्यापाठोपाठ भाजपने राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकले. आता ठाकरे गटाचे खासदार राऊत देखील आज नाशिक दौऱ्यावर येणार आहे.

Tags

follow us