Unseasonal Rain : अहमदनगर जिल्ह्यात सध्या अवकाळीने थैमान घातलं आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तालुक्यातील काही गावात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसासह काही भागात गारपीट आणि वादळाने मोठे नुकसान झालं आहे. यामुळे बळीराजा देखील हतबल झाला आहे.
लोणी व्यंकनाथ, चिंभळा, पारगाव फाटा, श्रीगोंदा शहर, येळपणे यासह काही भागात दुपारी बारा वाजल्यापासून आलेल्या पावसाने आणि गारपीट यामुळे उभ्या पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. कांदा काढणी सुरू असल्याने आणि जो कांदा काढला आहे, तो झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली. तर द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे द्राक्षे विक्रीचे बाजारभाव अवकाळी पावसाने कोसळल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
वडील आजारी अन् आदित्य मुख्यमंत्री बनण्याचं षडयंत्र रचत होते, राणेंचा दावा
गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. दररोज सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होऊ लागला आहे. सध्या शेतामध्ये उन्हाळी मूग, भुईमूग, कांदा, बिजोत्पादनाचा कांदा, मका, भाजीपालावर्गीय पिके आहे. बळीराजाची सर्व पिके चांगली बहरलेली होती, परंतु या अवकाळी पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी पीक जमीनदोस्त झाले. या अवकाळी पावसाचा फळबागांनाही मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.
सत्तेचा वापर शेतकऱ्यांच्या हितासाठी करावा, पराभवानंतर रवी राणांची प्रतिक्रिया
राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळते आहे. यातच अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्याने घरांची पडझड झाली तर काही ठिकाणी झाडे देखील खाली कोसळली. अनेक ठिकाणी वित्तहानी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान अद्यापही काही दिवस असेच वातावरण कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने नोंदवला आहे.