वडील आजारी अन् आदित्य मुख्यमंत्री बनण्याचं षडयंत्र रचत होते, राणेंचा दावा
Nitesh Rane vs Aaditya Thackeray : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी होते. ते लवकर आजारपणातून बाहेर येणार नसल्याने आदित्य ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री बनण्यासाठी षडयंत्र रचत होते, असा खळबळजनक दावा भाजपा नेते तथा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी जसलोक रुग्णालयाच्या एका खोलीत बैठका घेतल्या होत्या, असं राणे म्हणाले आहे. दरम्यान राणे यांनी केलेल्या विधानावरून पुन्हा एकदा राजकारण तापणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहे.
आमदार नितेश राणे हे रत्नागिरीत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे कुटुंबावर निशाणा साधला. ते म्हणाले , उद्धव ठाकरे हे आजारी असताना आदित्य ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्री बनण्याचे षडयंत्र रचत होते. माझे वडील आजारी आहेत, त्यांची तब्येत बारी होणार नाही. त्यासाठी जसलोक रुग्णालयातील एका खोलीत बैठका झाल्या. रुग्णालाच्या कोणत्या खोलीत या बैठका झाल्या हे मला माहिती आहे. त्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील मी देऊ शकतो, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
तसेच आदित्य ठाकरे यांच्या या षडयंत्राला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध केला होता. त्यांनतर हे प्रकरण थांबलं, असंही राणे म्हणाले आहे. दरम्यान आता राणे यांनी केलेल्या दाव्यावर ठाकरे कुटुंबियांकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच राणे यांच्या या विधानावर ठाकरे गटातील नेते काही बोलणार का हे येत्या काळात स्पष्ट होईल.
वेब सिरीजची बोल्ड अभिनेत्री आयुषी जैस्वाल
राणे विरुद्ध ठाकरे हे राजकीय समीकरण अनेक वर्षांपासून सुरूच आहे. दोन्ही कुटुंबातील नेते हे एकमेकांवर टीका टिप्पणी करण्याची एकही संधी सोडत नाही. अनेकदा जाहीर सभेच्या माध्यमातूनही या नेत्यांनी आरोप – प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडल्या आहेत. यातच आता नितेश राणे यांनी केलेल्या दाव्यावरून पुन्हा एकदा राणे विरुद्ध ठाकरे असा सामना पाहायला मिळणार हे नक्की.