Download App

कसब्यात धंगेकरांचा विजय अन् नाशिकमध्ये फटाके फोडून जल्लोष

नाशिक : काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे कसबा येथील विधानसभा पोटनिवडणुकीत (Bypoll Election) विजयी झाले आहेत. त्यामुळं नाशिकमध्ये (Nashik)काँग्रेस कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय. यावेळी महाविकास आघाडीतील पक्ष (Mahavikas Aghadi), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), ठाकरे गटाचे (Thackeray Group) पदाधिकारी, कार्यकर्तेदेखील यामध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.

28 वर्षांपासून भाजपचा (BJP) गड मानला जाणाऱ्या कसबा मतदारसंघात भाजपचा दारुण पराभव झालाय. कसबा मतदारसंघात (Kasaba Assembly) काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले. धंगेकर हे 11 हजार 40 मतांनी विजयी झाले. त्यामुळं त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे हेमंत रासने यांना धूळ चारलीय.

Pune : 2024ला कसब्यात पुन्हा कमळ फुलवणार, चंद्रकांतदादांचा निर्धार

त्यामुळं राज्यभरात महाविकास आघाडीकडून जल्लोष साजरा केला जातोय. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही (Nashik) काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात पेढे वाटून, फटाके फोडून रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला जातोय.

पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदार संघातील दोन्ही पोटनिवडणूक निवडणुकांकडं राज्याचं लक्ष लागलं होतं. कसबा पोटनिवडणुकीत राज्यासह केंद्रीय मंत्र्यांनीही या ठिकाणी उपस्थिती लावली. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा प्रचार दौरा केला होता. हे प्रचार दौरे अपयशी ठरल्याचं निकालावरुन स्पष्ट झालंय.

पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांचा विजय झालाय. नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत जोरदार जल्लोष केला.

Tags

follow us