Pune : 2024ला कसब्यात पुन्हा कमळ फुलवणार, चंद्रकांतदादांचा निर्धार
पुणे : कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाले आहे. याठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे 11 हजार 40 मतांनी विजयी झाले आहेत. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे. धंगेकर यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी पुण्यात एकच जल्लोष केला आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला होता. गेली 28 वर्षे याठिकाणी भाजपचा उमेदावर निवडून येते होता. यावेळी मात्र ही जागा काँग्रेसकडे गेली आहे. यावर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कसब्यातील जनतेने दिलेला कौल आम्ही नम्रपणे स्वीकारतो, असे ते म्हणाले आहेत.
Kasba By Election : बिचुकलेंवर ‘मतांचा पाऊस’ अन् दवेंचंही डिपॉझिट जप्त
लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे. कसब्याच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी निवडणुकीत सर्वस्व झोकून काम करणाऱ्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले आहेत व नव्याने उभे राहू आणि पुन्हा कमळ फुलवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील जनतेचा कौल आम्ही नम्रपणे स्विकारतो. लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे. कसब्याच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. या निवडणुकीत सर्वस्व झोकून काम करणाऱ्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार.
नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू!— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 2, 2023
दरम्यान यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कसबा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा पराभव झाला तो आम्हाला मान्यच आहे. आम्ही कुठे कमी पडलो, काय सुधारणा केल्या पाहिजेत याचे आत्मचिंतन आम्ही करणार आहोत, असे ते म्हणाले आहेत.