Download App

शेतकऱ्यांसाठी सुखदवार्ता…रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरू…पालकमंत्र्यांनी दिले आदेश

Ahilyanagar तील मुळा लाभक्षेत्रात रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरू करण्याच्या सूचन मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलांनी विभगाच्या अधिकाऱ्यांना दिल्या

  • Written By: Last Updated:

Water release by dike in Ahilyanagar for agriculture : अहिल्यानगर जिल्ह्यातील मुळा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी लक्षात घेवून रब्बी हंगामासाठी १७फेब्रुवारी २०२५ पासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभगाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

राज्यात नवे फौजदारी कायदे लागू होणार; शाहंसोबतच्या बैठकीनंतर फडणवीसांनी केलं स्पष्ट

यापुर्वी मुळा उजवा कालव्याचे रब्बी आवर्तन ठरलेल्या नियोजना प्रमाणे पूर्ण झाले आहे.उन्हाळी आवर्तन १ मार्च पासून करण्याचे नियोजन होते.परंतू लाभक्षेत्रात पाण्याची पातळी खूपच खालावल्याने शेतकर्याची पाणी सोडण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होती.

चहूबाजूंनी आरोपांच्या पिंजऱ्यात अडकलेल्या धनंजय मुंडेंना अजितदादांकडून राष्ट्रवादीत ‘मानाचं पान’

यासंदर्भात आ.मोनिका राजळे आणि आ.विठ्ठलराव लंघे यांनीही जलसंपदा मंत्री विखे पाटील यांची भेट घेवून रब्बी पिकांची तसेच पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेवून आवर्तन सोडण्याची विनंती केली होती.

अंजली दमानिया या स्वतःच न्यायपालिका; अजितदादा गटाकडून जोरदार प्रत्युत्तर

मंत्री विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागणीचे गांभिर्य लक्षात घेवून १७ फेब्रुवारी २० २५ पासूनच आवर्तन सुरू करण्याच्या सूचना त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याने लाभक्षेत्रातील लोकांना मोठा दिलसा मिळणार आहे.

follow us