राज्यात नवे फौजदारी कायदे लागू होणार; शाहंसोबतच्या बैठकीनंतर फडणवीसांनी केलं स्पष्ट

राज्यात नवे फौजदारी कायदे लागू होणार;  शाहंसोबतच्या बैठकीनंतर फडणवीसांनी केलं स्पष्ट

CM Devendra Fadanvis on New Criminal Law in Maharashtra : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. मात्र त्यात महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. ते म्हणजे राज्यात नवे फौजदारी कायदे लागू करण्याबाबत. त्यानंतर फडणवीसांनी त्याबाबत स्पष्ट केलं आहे.

चहूबाजूंनी आरोपांच्या पिंजऱ्यात अडकलेल्या धनंजय मुंडेंना अजितदादांकडून राष्ट्रवादीत ‘मानाचं पान’

यावेळू बोलताना फढणवीस म्हणाले की, दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तीनही नव्या फौजदारी कायद्यांवर चर्चा झाली. त्यानंतर आता येत्या सहा महिन्यांत या तीनही कायद्यांची आंमलबजावणी होणार आहे.

अंजली दमानिया या स्वतःच न्यायपालिका; अजितदादा गटाकडून जोरदार प्रत्युत्तर

तसेच त्यावर आम्ही वेगाने काम करू असं फडणवीसांनी सांगितलं. केंद्रात पारित झालेल्या तीन फौजदारी नव्या कायद्यांबाबत बैठक पार पडली. भारतीय न्याय संहिता, नागरिक सुरक्षा संहिता आणिसाक्ष अधिनियम असे हे तीन नवे कायदे आहेत.

स्वतंत्र्यानंतर पहिल्यांदाच कायद्यात बदल…

स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कायद्याची भाषा आमूलाग्र बदलली आहे. (Criminal Laws) सोमवार (दि. 1 जुलै)पासून तीन ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे हद्दपार झाले असून त्याजागी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तीन नवे कायदे अमलात आले आहेत. (laws) तेव्हा पासून सर्व फौजदारी गुन्हे नोंदवण्यापासून ते त्यांचा तपास व न्यायालयीन प्रक्रिया नव्या संहितांनुसार राबवली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube