Download App

सत्यजित तांबेंना टक्कर देणाऱ्या शुभांगी पाटील कोण आहेत ?

धुळे : नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून सत्यजित तांबे यांनी फॉर्म भरल्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडली होती. तर दुसरीकडे धुळे येथील शुभांगी पाटील यांना भाजपने ए बी फॉर्म दिला नव्हता.

आता नाशिक पदवीधर निवडणुकीत एक मोठ ट्विस्ट समोर आला आहे. अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील उमेदवार यांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. सत्यजित तांबेंना टक्कर देणाऱ्या शुभांगी पाटील कोण आहेत? याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेत सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावर कॉंग्रेस प्रदेशाध्याक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, ‘तांबे पिता-पुत्रांनी यांनी कॉंग्रेससोबत धोकेबाजे केली असून कॉंग्रेस सत्यजीत तांबे यांना नाही तर इतर अपक्ष उमेदवाराला पठिंबा देणार आहे.’

दुसरीकडे धुळे येथील शुभांगी पाटील यांना भाजपच्या वतीने त्यांना उमेदवारी दिली जाईल. अशी शक्यता होती. मात्र भाजपने कोणालाही ए बी फॉर्म दिलेला नव्हता. त्यामुळे शुभांगी पाटील या फक्त अपक्ष उमेदवार म्हणूनच त्या ठिकाणी मैदानात आहेत. तर आता अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील उमेदवार यांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे.

आता पाहुयात सत्यजित तांबेंना टक्कर देणाऱ्या शुभांगी पाटील कोण आहेत ?

शुभांगी पाटील या धुळे येथील आहेत. त्यांनी बीए, डीएड, एम.ए.बीएड आणि एल एल बी मध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. त्या सध्या धुळ्यातील भास्कराचार्य संशोधन संस्थेत शिक्षिका म्हणून काम करत आहेत. या शिवाय त्या महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशनच्या संस्थापक आहेत. तसेच पाटील या महाराष्ट्र नर्सिंग अँड पॅरामेडिकल एम्पॉईज असोसिएशनच्या प्रमुख सल्लागार आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी ग्रामविकास मंडळाच्या त्या सचिव आहेत. याशिवाय त्या धुळ्यातील एज्युकेशन सोसायटी आणि जळगावच्या गोपाल बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा आहेत.काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये होत्या. शिवाय त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे त्यांनी भाजपचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र भाजपचा पाठिंबा सत्यजीत तांबे यांना मिळणार हे दिसताच, शुंभागी पाटील यांनी मातोश्रीसोबत संपर्क साधला. तसेच ठाकरे गटाने त्यांना उमेदवारीही दिली.

त्यामुळे आता पक्षाविरोधात बंडखोरी केलेले. सत्यजित तांबे आणि ठाकरे गटाने म्हणजेच महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांच्यातील ही लढत अत्यंत रंजक ठरणार आहे. तर कालपर्यंत बिनविरोध होणार अशी चर्चा असलेली ही निवडणूक आता तांबे विरूद्ध पाटील अशी होणार आहे. तर या निवडणुकील कोणाचा विजय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us