Download App

बायकोला पेन्शन मिळाल्याचा भलताच आनंद, नवऱ्याने थेट तिला…

नाशिक : जुनी पेन्शन योजनेसाठी (Old Pension Scheme) राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. गेली अनेक दिवस कर्मचाऱ्यांनी ही मागणी लावून धरली. अखेर या मागणीवर सरकारकडून सकारात्मक चर्चा करण्यात आली. आज अखेरीस हा संप मागे घेण्यात आला आहे. संपला यश मिळाले याचा नाशिकमध्ये एकाने अनोख्या स्टाईलने आनंद साजरा केला. बायकोला पेन्शन मिळणार याचा आनंद नवऱ्याला झाल्याने त्याने तिला थेट उचलून डान्सचं सुरु केल्याची घटना नाशिकमध्ये पाहायला मिळाली आहे.

जाणून घ्या नेमका काय आहे प्रकार?
संपावर तोडगा निघाला आणि आपल्या पत्नीला पेन्शन मिळणार याचा भलताच आनंद नवऱ्याला झाल्याची घटना नाशिकमध्ये पाहायला मिळाली. जुन्या पेन्शन योजनेवर सरकारकडून निर्णय देण्यात आला हे समजताच संपाच्या ठिकाणीच नवऱ्याने आपल्या पत्नीला उचलून घेत मोठा जल्लोष केला आहे. याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. आपल्या बायकोला पेन्शन मिळणार याचा आनंद नवऱ्याला गगनात मावेनासा झाला होता.

तमन्ना भाटियाचा ग्लॅमरस लूक तुम्ही पाहिलात का ?

म्हणून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता
जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील सरकारी कामचारी संपावर होते. पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. कर्मचाऱ्यांचा वाढतो आक्रोश व कामबंद यामुळे विस्कळीत झालेली जनतेची कामे यावर आज सरकारकडून तोडगा काढण्यात आला. राज्य शासनाबरोबर झालेल्या बैठकीत जुनी पेन्शन लागू होण्याबाबत लेखी आश्वासन देण्यात आले यामुळे आज संप मागे घेण्यात आला. याचा आनंद नाशिक मध्ये साजरा करण्यात आला.

‘त्या’ प्रलंबित प्रश्नी आमदार आशुतोष काळेंचे गृहमंत्र्यांना साकडं

संपामुळे व्यवस्था कोलमडली
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारले होते. यामुळे राज्यातील महसूल, आरोग्य, शिक्षण विभाग… आदी विभागातील कामे ठप्प झाली होती. यामुळे जनमानसाची हाल होऊ लागले होते. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतल्याने सरकारला देखील कर्मचाऱ्यांपुढे माघार घ्यावी लागली.

Tags

follow us