‘त्या’ प्रलंबित प्रश्नी आमदार आशुतोष काळेंचे गृहमंत्र्यांना साकडं
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील आमदार आशुतोष काळे यांनी एका प्रलंबित प्रश्नी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. तालुक्यातील पोलिस इमारत व पोलिसांचे निवासस्थान याच्या निविदा निघाल्या आहेत. ही प्रलंबित कामे तातडीने मार्गी लागावी जेणेकरून पोलिसांना तातडीने त्यांची निवासस्थान मिळतील अशी मागणी यावेळी आमदार काळे यांनी विधानसभेत गृहमंत्र्यांना केली आहे. आगामी काळात ही कामे होणार का याकडे पाहणे देखील महत्वाचे राहणार आहे.
दरम्यान सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये अनेक महत्वाच्या विषयांवर सध्या चर्चा सुरु आहे. यातच नगर जिल्ह्यातील कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी एक महत्वाच्या व प्रलंबित प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. तसेच या प्रश्नी काळे यांनी या प्रश्नासाठी थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.
नेमकं काय म्हणाले आमदार काळे?
महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार हे माझा मतदार संघा कोपरगावला आले होते. यावेळी विविध कामांचे उदघाटन व माझ्या आजोबांच्या पुतळ्याचे लोकार्पणसाठी ते आले होते. यावेळी त्यांनी त्यावेळी जाहीर कार्यक्रमात पोलीस इमारत व पोलिसांची निवासस्थाने याबाबत शब्द दिला होता. या कामांच्या निविदा देखील निघाल्या आहेत.
शेवगाव नगर परिषदेच्या कचरा डेपोला आग !
आज या माध्यमातून माझी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, पोलीस इमारत व निवास्थान यांची कामे लवकर पूर्ण व्हावी जेणेकरून पोलिसांना त्यांची निवासस्थान मिळतील. तसेच पोलीस खात्यामधील अनेक पद मंजूर झालेली आहे. मात्र हे लोक अद्याप हजर झालेली नाही आहे.
त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतेल प्रभावी
यामुळे राज्याचे गृहमंत्री फडणवीस आपण या प्रश्नाकडे तुम्ही स्वतः लक्ष देऊन या मंजूर पदावर माणसे हजर राहतील. तसेच शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये आवश्यक मनुष्यबळ भरले जातील. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असलेले सीसीटीव्ही बसवण्यात यावी अशी मागणी यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.