त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील प्रभावी

त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील प्रभावी

मुंबई : स्त्री असो वा पुरुष प्रत्येकजण आपण सुंदर दिसावे यासाठी शरीराची काळजी घेत असतो. सुंदर दिसण्यासाठी व्यक्ती सौंदर्य प्रसाधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असतात. मात्र अशा साधनांमध्ये केमिकलचा वापर होत असल्याने याचा वापर देखील मर्यादीत करणे गरजेचा असतो. यासाठी नैसर्गिकरित्या त्वचा निरोगी आणि चमकदार बनविण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. जाणून घ्या अशा काही 5 पदार्थांबद्दल जे तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यात मदत करेल.

मखाना
पांढरे मखाना आपल्या त्वचेला उजळ बनवतात आणि निरोगी ठेवतात. मखाना हा अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतो. यामध्ये असलेले पोषक घटक त्वचेला चमकदार बनवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

हिरव्या पालेभाज्या
निरोगी शरीरासाठी हिरव्या पालेभाज्या नेहमीच फायदेशीर ठरतात. यातच पोषक घटकाने युक्त असलेल्या हिरव्या पालेभाज्या त्वचेसाठी देखील महत्वाच्या असतात.
पालेभाज्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. हिरवी पालेभाजी आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. यामुळे तुमच्या चेहऱ्याचा रंग सुंदर होतो.

पाच दिवसांचे सर्च ऑपरेशन अन्…पोलिसांनी सांगितला जयसिंघानीच्या अटकेचा घटनाक्रम

बदाम
शरीराच्या वाढीसाठी बदाम हे फायदेशीर असतात हे तर आपण जाणतो. त्वचा चमकदार दिसावी यासाठी देखील बदामाचा वापर केला जातो. बदाम खाल्ल्याने आपली त्वचा हायड्रेट होते आणि ते अधिक तरुण तसेच चमकदार दिसते. बदामात असलेले पोषक घटक शरीरातील हानिकारक टॉक्सिन्स काढून टाकतात. यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसते.

IND vs AUS : वनडेतील सर्वात मोठ्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने फलंदाजांना फटकारले

मुळा
तुम्ही आजवर मुळ्याची भाजी खाल्ली असेल मात्र हाच मुळा त्वचेसाठी देखील फायदेशीर असतो. मुळा हा व्हिटॅमिन सीने युक्त असतो. तसेच मुळ्यात असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे आपली त्वचा टवटवीत राहण्यास मदत होते. त्वचा निरोगी ठेवण्यास मुळा मदत करते.

कलिंगडाचे बी
उन्हाळ्यात सर्वत्र कलिंगड मिळतात. शरीराला डिहायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड जसे फायदेशीर ठरते तसेच ते त्वचेसाठी देखील उपयु्क्त आहे. कलिंगडाचे बी व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करते. यामुळे आपल्या त्वचेला ओलावा मिळतो आणि ती मऊ राहते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube