Download App

Work From Home च्या जाळ्यात अडकताय? युवकाला घातला लाखोंना गंडा

  • Written By: Last Updated:

Work From Home : तुम्हालाही वर्कफ्रॉम होम जॉबच्या (Work From Home) जाहिराती येत आहेत का? तर सावधान कारण त्यातून तुम्हाला गंडा घतला जाण्याचा दाट शक्यता आहे. करण अहमदनगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे वर्कफ्रॉम होम जॉब देण्याचा बहाणा करत एका युवकाला 12 लाख 36 हजार 267 रुपयांना फसविण्यात आले आहे.

Maratha Reservation : ‘मराठ्यांना सल्ले देऊ नका’; ‘OBC मधून आरक्षण शक्य नाही’ म्हणणाऱ्यांना जरांगेंनी सुनावलं

या प्रकरणी नगरच्या सायबर पोलिसांनी तातडीने शोध घेत तीन आरोपींना ताब्यात घेतले. यातील दोन आरोपी नाशिकचे तर एक आरोपी मुंबईतील आहे. यामध्ये हिरामण पंडित सोनवणे (वय 36, रा. प्रिन्स पॅलेस अपार्टमेंट, धात्रक फाटा, आडगाव, नाशिक), शक्ती माणिकलाल कर्नावट (वय 34, रा. आडगाव, नाशिक) व प्रथम भावेश गथाणी (वय 30, रा. घाटकोपर, मुंबई) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत.

Saroj Patil : गोविंद बागेतील पाडव्याला अजितदादा सहभागी होणार का? प्रतापराव पवारांच्या घरी काय घडलं?

या आरोपींनी बाबुर्डी बेंद येथील दत्तात्रेय चोभे यांना व्हॉटसअॅप व टेलिग्रामवरून आरोपींनी संपर्क साधला. आरोपींनी इन्फो इज इंडिया लि. कंपनीचे अधिकारी असल्याचे सांगत पार्टटाईम जॉब देतो असे सांगितले. तसेच विविध बँक खात्यांवर पैसे भरण्यास लावले. त्यानुसार चोभे यांनी 12 लाख 36 हजार 267 रुपये बँक खात्यांवर भरले होते. ही फसवणूक लक्षात आल्यावर त्यांनी नगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय सोनवणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल सानप यांच्या पथकाने आरोपींचा तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर शोध घेतला. पथकाने हरियाणा, गुजरात, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश राज्यांत तसेच नाशिक व मुंबई येथे तपास करून आरोपींना ताब्यात घेतले. पथकाने विविध बँकांशी संपर्क करून त्यांच्या खात्यात गेलेले पाच लाख पाच हजार 418 रुपये आतापर्यंत मिळविले आहेत. उर्वरित रक्कम मिळविण्याचे प्रयत्न सायबर पोलिसांकडून सुरू आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

Tags

follow us