Download App

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रभाकर मांडे यांचे निधन, यावर्षीचं पद्मश्रीने सन्मानित

Prabhakar Mande :डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागातील संशोधक, लोकसाहित्याचे अभ्यासक पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे (Prabhakar Mande) यांचे अहमदनगर (Ahmednagar) येथे आज संध्याकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. यावर्षीच प्रभाकर मांडे यांना पद्मश्रीने (Padmashri) सन्मानित केले होते.

डाॅ. प्रभाकर मांडे यांचा जन्म छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सावखेड येथे 1933 मध्ये झाला होता. त्यांचे शिक्षण छत्रपती संभाजीनगरमधील मिलिंद महाविद्यालय येथे झाले. लोकसाहित्याचा अभ्यास करणारे संशोधक अशी त्यांची ओळख होती.

2010 आणि 2018 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी लोककला संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. धोंडीराम संभाजी वाडकर यांनी ‘डॉ. प्रभाकर मांडे यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास : लोकसाहित्याच्या विशेष संदर्भाने’ नावाचा ग्रंथ त्यांच्या साहित्यांवर लिहिला आहे.

Corona JN.1 Variant: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेचा आढावा; घाबरू नका, काळजी घ्या, एकनाथ शिंदेंचे आवाहन

डाॅ. मांडे यांनी लोकसाहित्य संशोधन मंडळाची स्थापना केली होती. ही संस्था महाराष्ट्रात लोकसाहित्याच्या अभ्यासकांना एकत्र आणते. त्यांनी महाराष्ट्रात आणि गोव्यात लोकसाहित्यविषयक परिषदा आयोजित केल्या होत्या. मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली 12 हून अधिक विद्यार्थी पीएच.डी. व एम.फिल झाले आहेत.

आम्ही जिंकू शकलो नाही! धायमोकलून रडत देशाला पदक देणाऱ्या साक्षीचा कुस्तीला अलविदा

त्यांनी लिहिलेली पुस्तके
आदिवासी मूलत: हिंदूच
आदिवासींचे धर्मांतर : एक समस्या
उपेक्षित पर्व
कलगीतुऱ्याची आध्यात्मिक शाहिरी (1961 साली लिहिलेल्या पीएच.डीच्या प्रबंधाचे ग्रंथरूप)
गावगाडा, जातगाव आणि जातगावाची पंचायत
गावगाड्याबाहेर
चतुरदास विरचित एकादश स्कंध भाषाटीका (हिंदी, संपादित)
दलित साहित्याचे निराळेपण
पंडित दामोदर रचित महानुभावीय पद्मपुराण (संपादित)
बिल्वदल
बुडालेला गाव
भारतीय आदिवासींचे स्थान
भारतीय आदिवासी : विकासाच्या समस्या
मांग आणि त्यांचे मागते
मायबोलीचे व्याकरण व लेखन (सहसंपादित)
मौखिक वाङ्मयाची परंपरा
रामकथेची मौखिक परंपरा
लोकगायकांची परंपरा
लोकपरंपरा आणि सामाजिक परिवर्तन
लोकपरंपरेतील शहाणपण
लोकपरंपरेतील स्त्रीप्रतिमा
लोकमानस आणि लोकाचार
लोकमानस रंग आणि ढंग
लोकरंग आणि अभिजात रंगभूमी
लोकरंगकला आणि नागर रंगभूमी (संपादित)
लोकरंगधारा
लोकरंगभूमी
लोकसंस्कृती आणि इतिहासदृष्टी
लोकसंस्कृतीचे मूलतत्त्व
लोकसाहित्याचे अंतःप्रवाह
लोकसाहित्याचे स्वरूप
शिक्षणनीतीचे राजकारण
श्रीसमर्थांचा लक्षणविचार
सांकेतिक आणि गुप्त भाषा : परंपरा व स्बरूप
पुरस्कार आणि सन्मान

Tags

follow us