Download App

मुंबईकरांची लाईफलाईन सुरू, लोकल ट्रेनबाबत मोठी अपडेट, कोणत्या स्थानकावरील लोकल सुरू?

मुंबई आणि उपनगरांमध्ये अजूनही पावसाचा जोर कायम आहे. मात्र, आता काही प्रमाणात रेल्वे सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे.

  • Written By: Last Updated:

Mumbai Local Update : मुसळधार पावसामुळं मुंबईकरांच जनजीवन विस्कळीत झालं असून, याचा सर्वात मोठा फटका हा मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनला बसल्याच पाहायला मिळत आहे. (Mumbai) काल सकाळच्या सुमारास मुंबईतील मध्य रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली होती. मध्य रेल्वेवरील कुर्ला आणि सायनदरम्यानच्या अप-फास्ट आणि डाउन-फास्ट लोकल सकाळी ११.२५ पासून बंद ठेवण्यात आली होती तर त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी ११.४५ पासून स्लो लोकल सेवाही स्थगित करण्यात आली होती.

मोठी बातमी, पावसामुळे झेलम, डेक्कन एक्सप्रेससह 14 रेल्वे रद्द; पहा संपूर्ण लिस्ट

मुंबई आणि उपनगरांमध्ये अजूनही पावसाचा जोर कायम आहे. मात्र, आता काही प्रमाणात रेल्वे सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. मात्र, जरी लोकल पुन्हा सुरू झाली असली तरी देखील ट्रॅकवर साचलेल्या पाण्यांमुळे अडथळा निर्माण होत असून, अजूनही ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलेलंच आहे. मुंबई आणि उपनगरामध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. मुंबईच्या कुर्ला आणि सायन स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल आणि एक्सप्रेस खोळंबल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडून येणाऱ्या लोकल रद्द केल्यानं कल्याणच्या रेल्वे स्थानकावर प्रवाशी अडकून पडले होते. दरम्यान आता पुन्हा एकदा लोकल सुरू झाली आहे, मात्र वेळापत्रक अजूनही विस्कळीतच आहे, त्यामुळे कल्याणच्या रेल्वे स्टेशनवर प्रवाशांनी गर्दी केली होती. दरम्यान, दुसरीकेड दादरहून बदलापूरडे धीमी लोकल रवाना झाली. मात्र, सायन रेल्वे ट्रॅक अजूनही पाण्याखालीच आहे. बदलापूर लोकल मागील 1 तासांपासून सायन आणि कुर्लाच्या मध्येच अडकल्यानं या मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

follow us