Download App

आम्ही जिंकू शकलो नाही! धायमोकलून रडत देशाला पदक देणाऱ्या साक्षीचा कुस्तीला अलविदा

  • Written By: Last Updated:

WFI Elections 2023 : भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Singh) यांचे निकटवर्तीय संजय सिंह (Sanjay Singh) यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.बृजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाच्य अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात साक्षी मलिक व इतर कुस्तीपटूंनी दिल्लीत आंदोलन केले होते. पण बृजभूषण शरण सिंह यांच्या जवळील व्यक्तीची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने व्यथित झालेल्या साक्षी मलिक (Sakshi Malik) हिने कुस्तीतून निवृत्तीची घोषणा जाहीर केली आहे. हा निर्णय जाहीर करताना ती भावूक झाली.


निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना वगळलं! लोकसभेत नवं विधेयक मंजूर…

दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणारी साक्षी मलिक म्हणाली, आम्ही चाळीस दिवस रस्त्यावर आंदोलन केले आहे. देशातील लोकांनीही आम्हाला पाठिंबा दिला होता. परंतु बृजभूषण शरण सिंह यांच्या व्यावसायिक भागीदार आणि निकटवर्तीय कुस्ती महासंघाचा अध्यक्ष निवडला जात आहे. त्यामुळे मी कुस्ती सोडत आहे. आम्हाला पाठिंबा देणाऱ्यांचेही मी आभार मानते. आम्ही पूर्ण ताकदीने लढाई लढलो आहे. तरही अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या मर्जीतील माणूसच अध्यक्षपदी निवडला जात असले तर मी माझा खेळ सोडत आहे.

लोकसभेतून आणखी 3 खासदार निलंबित, आतापर्यंत 146 खासदारांवर कारवाई

संजय सिंह कोण आहेत ?
बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्ती संजय सिंह यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या अनीता श्योराणचा पराभव केला आहे. सिंह यांना 50 पैकी 41 जणांचे समर्थन मिळाले आहेत. संजय सिंग हे उत्तर प्रदेश कुस्ती संघाचे उपाध्यक्ष राहिले आहेत. तसेच बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय असून, त्यांच्याशी व्यावसायिक भागिदारी आहेत. त्यामुळे कुस्ती महासंघावर खासदार ब्रिजभूषण यांचेच वर्चस्व राहिले आहे.

Tags

follow us