लोकसभेतून आणखी 3 खासदार निलंबित, आतापर्यंत 146 खासदारांवर कारवाई
MPs Suspended : लोकसभा अध्यक्षांनी आणखी तीन खासदारांना (MPs Suspended) लोकसभेतून निलंबित केले आहे. सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी अध्यक्षांनी काँग्रेस खासदार नकुल नाथ, डीके सुरेश आणि दीपक बैज यांना चालू हिवाळी अधिवेशनातून निलंबित केले आहे. त्यामुळे निलंबित खासदारांची संख्या 146 झाली आहे.
संसदेच्या सुरक्षेबाबत गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांच्या निवेदनाची मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली होती. त्यानंतर 14 डिसेंबरपासून खासदारांचे निलंबन सुरू झाली आहे. 13 डिसेंबरच्या दुपारी संसदेच्या सुरक्षेतील एक मोठी त्रुटी समोर आली होती. लोकसभेत दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली आणि कॅनमधून गँस पसरवला होता. याप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे.
WFI Elections 2023 ; ब्रिजभूषण सिंह यांच्या निकटवर्तीयाकडे कुस्ती महासंघाचे अध्यक्षपद
प्रश्नोत्तराचा तास संपताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तिन्ही खासदारांची नावे घेतली आणि तुम्ही सभागृहाचे कामकाज वारंवार विस्कळीत करत आहात, फलक दाखवत आहात, घोषणाबाजी करत आहात, कागदपत्रे फाडत आहात आणि लोकसभा कर्मचाऱ्यांवर फेकत आहात. हे सभागृहाच्या शिष्टाचाराच्या विरोधात आहे, असे म्हटले.
पुणे बुक फेस्टिवल वादात : JNU सह सात विद्यापीठांवरील पुस्तकाच्या चर्चेचा कार्यक्रम रद्द
निलंबन कधी आणि किती?
सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी 14 डिसेंबरला 13 खासदार, 18 डिसेंबरला 33, 19 डिसेंबरला 49 आणि 20 डिसेंबरला दोन सदस्यांना निलंबित करण्यात आले. त्याचवेळी 14 डिसेंबरला राज्यसभेतून 1 आणि 18 डिसेंबरला 45 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं.
नियोजित तारखेनुसार, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा कामकाजाचा दिवस शुक्रवारी (22 डिसेंबर) आहे. आज (गुरुवारी) सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केले जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.