शिंदे गट कोणत्या चिन्हावर लढणार? संजय शिरसाटांनी कन्फ्यूजन केलं दूर

शिंदे गट कोणत्या चिन्हावर लढणार? संजय शिरसाटांनी कन्फ्यूजन केलं दूर

Sanjay Shirsath : राज्यात सध्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता महायुतीसोबत हातमिळवणी केलेल्या शिंदे गटासंदर्भात वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे. शिंदे गट कमळाच्या चिन्हावर निवडणूका लढवणार असल्याचं बोललं जातंय. तर विरोधकांकडूनही हा दावा करण्यात येत आहे. मात्र, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांनी (Sanjay Shirsath) हे कन्फूजन दूर केलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याशी चर्चा झाली असून शिंदे गट धनुष्यबाण चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचं शिरसाट यांनी ठणकावून सांगितलं आहे.

संसदेत घुसखोरी टळणार; संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी लष्कर दलाच्या तुकडीकडे

संजय शिरसाट म्हणाले, राजकारणात भविष्य पाहणारे जास्त झाले आहेत. तुम्ही अनेक वेळा पक्षाशी गद्दारी केली आहे. त्यामुळं तुम्ही आम्हाला शिकवू नका. तुम्हाला आता आतल्या मीटिंगचे ही मुद्दे कळतायत त्यामुळं कठीण झालं तुमचं, तुम्ही कुठंही कान लावू नका, तुमच्या पक्षाचे अस्तित्व संपले असून तिकडे आधी बघा नंतर दुसरीकडे बघा, असा सल्लाच संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे गटाला दिला आहे.

‘मैं अटल हूं’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; पंकज त्रिपाठींनी साकारली वाजपेयींची हुबेहूब व्यक्तिरेखा

तसेच पूर्वी झालेल्या घटना बाबत पुनरावृत्ती होईल असे समजू नका. आम्ही उठाव केला तेव्हा अमित शाहांसोबत स्पष्टपणे संवाद केला होता, त्यामुळे आगामी निवडणूक आम्ही युतीत लढणार असून धनुष्यबाण चिन्हावरच लढणार आहोत, त्यामुळे कमळावर लढण्याच्या प्रश्न नसल्याच संजय शिरसाट म्हणाले आहेत.

रेल्वे विभागात 3000 हून पदांसाठी भरती सुरू, १० वी पास, आयटी उत्तीर्ण उमेदवार करू शकतात अर्ज

काही दिवसांपूर्वीच 5 राज्यांत निवडणूक पार पडल्या. या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे आता भाजपलाही भलताच कान्फ्यूडन्स आल्याचं बोललं जात आहे. एकूण भाजप शिंदे गटातील नेत्यांना आता कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचंही सांगण्यात येत आहे. मात्र, संजय शिरसाट यांनी हे तर्क-वितर्क खोडून काढले आहेत.

जयंत पाटलांचे चिमटे तर फडणवीसांचे टोमणे; गुन्हेगारी, ड्रग्ज, दंगलीवरुन सभागृहात खडाजंगी…

दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हापेक्षा भाजपचे कमळ चिन्ह अधिक प्रभावी ठरेल, असं शिवसेना (शिंदे गटातील) काही खासदारांचं मत आहे. त्यामुळे आम्हाला कमळ चिन्हावरच निवडणूक लढू द्या, अशी विनंती त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केल्याचंही सांगण्यात येतंय. त्यामुळे आता शिंदे गट नेमक्या कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार हे आगामी निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे.

youtube.com/watch?v=_1jZr_orW3w

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube