‘आदित्य ठाकरेंना संजय राऊत चावलायं म्हणूनच..,’; संजय शिरसाटांनी दोघांनाही घेरलं

‘आदित्य ठाकरेंना संजय राऊत चावलायं म्हणूनच..,’; संजय शिरसाटांनी दोघांनाही घेरलं

Thackeray Vs Shinde : आदित्य ठाकरेंना(Aaditya Thackeray) संजय राऊत(Sanjay Raut) चावलायं म्हणूनच ते अशी वक्तव्ये करीत असल्याची घणाघाती टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट(Sanjay Shirsat) यांनी केली आहे. विविध मुद्द्यांवरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांसह आदित्य ठाकरे यांच्याकडून सत्ताधारी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले जात असल्याच पाहायला मिळतयं. आदित्य ठाकरे यांच्या टीकेववरुन संजय शिरसाटांनी राऊत-ठाकरे दोघांनाही घेरलं आहे.

विमानात नवजात बाळाला श्वसनाचा त्रास; मराठमोळा IAS अधिकारी 6 महिन्याच्या मुलासाठी ठरला देवदूत

संजय शिरसाठ म्हणाले, संजय राऊतचं आपण समजू शकतो त्याला ती सवयं आहे पण संजय राऊत हा आदित्य ठाकरेंना चावला म्हणूनच अशी वक्तव्ये आदित्य ठाकरे करताहेत, देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना बाळबुद्धी नाही तर बाल बुद्धी असे म्हटले होते, स्वतःचे नाव जरी बाळासाहेब ठेवले तरी तो त्याग तुमच्यात येणार नसल्याची टीकाही संजय शिरसाट यांनी केली आहे.

‘ठाकरेंसोबत साखरपुडा, पण लग्नासाठी..,’; प्रकाश आंबेडकरांचा चिमटा

तसेच सत्ता होती तेव्हा शिवसेनाप्रमुखाच्या स्मारकाची एक वीट सुद्धा रचली नाही. आदित्य सध्या भ्रमात आहे कारण ट्विट केल्याने दौरे रद्द होत नाहीत. बाळासाहेबांची मेहनत तुमच्यात दिसून येत नाही, तुम्ही महाराष्ट्राच्या लायकीचे नाहीत, असंही संजय शिरसाट आदित्य ठाकरे यांना उद्देशून म्हणाले आहेत.

Asian Games 2023 : अदितीने रचला इतिहास! ‘गोल्फ’मध्ये पदक जिंकणारी पहिलीच भारतीय

यावेळी बोलताना संजय शिरसाट यांनी दसरा मेळाव्यावरुनही ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मैदान आम्हालाच मिळालं पाहिजे, आम्हाला नाही मिळालं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील. विरोधक सत्तेत असताना त्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची साधी विटही रचता आलेली नाही, शिवसेना प्रमुखांचे विचार आम्हाला पुढे न्यायचे आहेत, संजय राऊतला आर्मी कशाला पाहिजे, दोन पोलिस आले तर पळून जाईल, असंही संजय शिरसाट म्हणाले आहेत.

Eknath Shinde यांचे मुख्यमंत्रीपद हिवाळी अधिवेशनापूर्वी जाऊ शकते!, शरद पवार गटाचा दावा

दसरा मेळाव्यावरुन शिवसेनेच्या शिंदे-ठाकरे गटामध्ये जोरदार संघर्ष पेटल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

मागील वर्षी ठाकरे गटाला दसरा मेळाव्याची परवानगी देण्यात आली आता, यंदाच्या वर्षी कोणाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर गाजणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube