‘ठाकरेंसोबत साखरपुडा, पण लग्नासाठी..,’; प्रकाश आंबेडकरांचा चिमटा
Prakash Ambedkar News : उद्धव ठाकरेंसोबत साखरपुडा, पण लग्नासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीरुपी भटजींचे अडथळे असल्याचा चिमटाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी काढला आहे. प्रकाश आंबेडकरांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं असून आंबेडकरांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगू लागली आहे.
Vikhe Vs Thorat : समन्यायी पाणीवाटप कायद्याच्या पापाची जबाबदारी टाळता येणार नाही; विखेंची टीका
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, शिवसेनेबरोबर आमची बोलणी झाली. आता लग्नाची तारीख ठरली पाहिजे. मात्र, दोन भटजींमुळे लग्नाची तारीख ठरवलेली नाही. एक काँग्रेसचा नावाचा भटजी आहे आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा भटजी आहे. हे दोन भटजी जोपर्यंत लग्नाची तारीख ठरवत नाही, तोपर्यंत आमचं लग्न होणार नाही. त्यामुळे आम्ही काय करणार.? असा सवाल आंबडेकर यांनी केला आहे.
ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांना धमक्यांचे फोन; काय आहे प्रकरण?
देशात एकीकडे सत्ताधारी भाजपला चीतपट करण्यासाठी विरोधकांची वज्रमूठ इंडिया आघाडी गठीत झाली. या आघाडीमध्ये भाजपविरोधातले देशातील सर्वच पक्ष सामिल झाले आहेत. तर भाजपसोबतही काँग्रेसविरोधातील गटतट भाजपसोबत सामिल आहेत. त्यामुळे आगामी निवडणुका जवळच येऊन ठेपल्याने सर्वच नेत्यांकडून मतदारसंघात चाचपणी सुरु झाल्याचं दिसून येतयं.
Panvel Mahanagarpalika मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांची भरती सुरू, महिन्याला ६० हजार पगार
वंचित बहुजन आघाडीची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत युती आहे. ठाकरे गटही भाजपविरोधातल्या इंडिया आघाडीचा प्रमुख घटक मानला जात आहे. तर आमची युती ही उद्धव ठाकरे गटासोबत आहे, मात्र, आम्ही महाविकास आघाडीचा घटक नाही. तसेच इंडिया आघाडीचाही घटक नसल्याचं वंचित बहुजन आघाडीने पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वीच इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची बैठकीत मुंबईत पार पडली. या बैठकीसाठी प्रकाश आंबेडकरांना देण्यात आलेलं नव्हतं. वंचितला निमंत्रण का नाही? याबाबत इंडिया आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. इंडिया आघाडीसाठी सामिल होण्याबाबतचं पत्रचं आम्ही काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंना पाठवलं मात्र, अद्याप उत्तर न आल्याने आम्ही लोकसभेच्या 48 जागा लढवणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलं आहे.
सोशल मीडियावर पोस्टद्वारे आंबडेकरांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेस सीपीआयचा (एम) प्रवक्ता म्हणून वापर करत असल्याचाही आरोप आंबेडकरांनी केला आहे.
आणि, आता ते सीपीआय (एम)चा प्रवक्ता म्हणून वापर करत आहेत!
सीताराम येचुरी यांनी राष्ट्रपतीपदासाठी यूपीएचे उमेदवार म्हणून बाळासाहेब आंबेडकरांचे नाव सुचवल्यावर काय झाले होते? काँग्रेसचा प्रतिसाद काय होता ते आता सीताराम येचुरींनी देशाला सांगावे.
बाळासाहेबांची आणि वंचित बहुजन आघाडीची… pic.twitter.com/0lJQLdGU6c— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) October 1, 2023