Vikhe Vs Thorat : समन्यायी पाणीवाटप कायद्याच्या पापाची जबाबदारी टाळता येणार नाही; विखेंची टीका

Vikhe Vs Thorat : समन्यायी पाणीवाटप कायद्याच्या पापाची जबाबदारी टाळता येणार नाही; विखेंची टीका

Radhakrishna Vikhe : यंदा कमी पावसामुळे नगर-नाशिक जिल्ह्यातील जायकवाडीत (Jayakwadi) जाणाऱ्या पाण्याबाबत विभागीय संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोनच दिवसांपूर्वी कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी समन्यायी पाणीवाटप कायद्याविरोधात आपणच संघर्ष केला होता, हा संघर्ष सुरू असतांना अनेक नेते गप्प बसून होते, अशी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटलांवर केली होती. दरम्यान, आता विखेंना जोरदार पलटवार केला. समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या पापाची जबाबदारी टाळता येणार नाही, असं सूचक वक्तव्य केलं.

शरद पवार गटाकडून जुन्नरची जागा अतुल बेनके लढणार का? पवार म्हणाले… 

नगर जिल्ह्यात आतापासून समन्यायी पाणी धोरणाला जबाबदार कोण यावरून विखे-थोरात यांच्यात एकमेकांना जबाबदार धरत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. थोरातांनी केलेल्या टीकेवर आता मंत्री विखेंना प्रत्युत्तर दिलं. ते पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विखे बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, ज्यांनी एकेकाळी समन्यायी पाणी वाटप कायदा विधेयकाला सभागृहात पाठिंबा दिला आणि नगर जिल्ह्यातील हक्काचे पाणी सोडण्यास हातभार लावला, तेच आज पाणी सोडण्याच्या विरोधात बोलू लागले आहेत. या कायद्याच्या पापाची जबाबदारी जिल्ह्याच्या मानगुटीवर टाकून तुम्हाला जबाबदारी टाळता येणार नाही, असा विखेंनी थोरात यांच्यावर केला आहे.

ते म्हणाले की, यंदा धरणे भरली असली तरी पावसाची चिंता संपलेली नाही. मराठवाड्याला पाणी देण्याची टांगती तलवार आजही आपल्यावर आहे. ज्यांनी समन्यायी पाणीवाटप कायद्याचे भूत जिल्ह्याच्या मानगुटीवर बसवले. तेच आता मी पहिल्यांदा विरोध केल्याची भाषा बोलू लागले आहेत. हे आश्चर्यकारक आहे. पण तुम्ही पाणी सोडण्याला पाठिंबा दिला हा इतिहास का विसरता, असा सवाल केला.

थोरात नेमंक काय म्हणाले होते?
2014 मध्ये राष्ट्रपती राजवट असतांना समन्यायी कायदा लागू झाला. मात्र, या कायद्यातील त्रुटींबाबत आपण 0सातत्याने आवाज उठवला आहे. संगमनेर तालुक्यातील नागरिकांनी एकत्र येत तालुका बंद ठेवून या कायद्याचा तीव्र निषेध केला. या कायद्याच्या विरोधात आम्ही मोर्चे काढले, संघर्ष केला, या कायद्याविरोधात आमची न्यायालयीन लढाईही सुरू आहे. मात्र, संघर्षाच्या काळात अनेक नेते गप्प होते, अशी टीकाही थोरात यांनी केली होती

थोरात यांनी केलेल्या आरोपावर श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी नुकतेच प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनीही नाव न घेता थोरांना समन्यायी पाणी वाटप धोरणाला जबाबदार धरत टीका केली. दरम्यान, थोरातांनी केलेल्या टीकेला आता बाळासाहेब थोरात काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube