Download App

अघोरी विद्या आम्हाला कळत नाही, मंत्री गोगावलेंचे राष्ट्रवादी अन् ठाकरे गटाला प्रत्युत्तर

Bharat Gogawale On Aghori Puja :  राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात चर्चेत

  • Written By: Last Updated:

Bharat Gogawale On Aghori Puja :  राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात चर्चेत आले आहे. ठाकरे गटाचे नेते वंसत मोरे (Vasant More) यांनी गोगावले यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया शेअर करत गोगावले यांनी अघोरी पूजा (Aghori Puja) केली असल्याचा दावा केला आहे. तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी देखील भरत गोगावलेंचा व्हिडीओ पोस्ट करत भरतशेठ आणि अघोरी विद्या म्हणजेच पालकमंत्री का? असा सवाल उपस्थित केला आहे तर भरत गोगावले यांनी ठाकरे गटाचे नेते वंसत मोरे आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांना प्रत्युत्तर देत आम्ही  शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्ही लढणारे आहोत रडणारे नाही. असं म्हटले आहे.

माध्यमांशी बोलताना मंत्री भरत गोगावले म्हणाले की, आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्ही लढणारे आहोत रडणारे नाही. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या प्रामाणिक माणसाबरोबर काम करतोय, त्यामुळे अघोरी विद्या हे काही आम्हाला कळत नाही. आम्हाला काही माहीत नाही. जे नशिबात आहे ते होतं. असं माध्यमांशी बोलताना मंत्री गोगावले म्हणाले.

माध्यमांशी पुढे बोलताना मंत्री गोगावले म्हणाले की, अघोरी विद्या करून जर काही मिळवायचे असते तर आतापर्यंत कधीच आम्ही पालकमंत्री पद मिळवले असते. परंतु, जे काही साधू, महाराज येतात आम्हाला शुभ आशीर्वाद द्यायला किंवा त्यांचं काही काम असतं त्यासाठी येतात. खरोखरच जर आम्हाला कोणाला अघोरी विद्या करायची असती तर त्यांनी आपला व्हिडिओ काढून दिला असता का? साधा आणि सोपा प्रश्न आहे. कर नाही त्याला डर कशाला आम्ही फ्री माईंडने चालणारे लोक आहोत. आम्ही हिंदुत्वाला मारणारे लोक आहोत, देवाला मानणारे लोक आहोत. ज्यांना ही आघोरी विद्या वाटत असेल त्यांना वाटू द्या. असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली.

भारताला मोठा धक्का, गोलंदाजांना घाम फोडणारा फलंदाज जखमी, मालिकेतून बाहेर होणार?

एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालायला हवे : सूरज चव्हाण

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी या प्रकरणात गोगावले यांच्यावर जोरदार टीका केली होती.  संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्ती बाबा बुवा यांच्याकडून पुजा करून घेत आहे. एकनाथ शिंदे यांनी यामध्ये लक्ष घालायला हवे. पालकमंत्रीपदासाठी अशा प्रकारच्या पुजेचा घाट घालणं चुकीचा आहे. असं सूरज चव्हाण यांनी म्हटले आहे.

follow us