पार्थ पवारांच्या अडचणींत वाढ?, मुंढवा जमीन प्रकरणात मोठी घडामोड, सहकाऱ्यांना नोटीसा

सुनेत्रा पवार यांचे विशेष कार्य अधिकारीविकास पाटील आणि राम चौबे यांना आर्थिक गुन्हे शाखेने नोटिसा बजावल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे.

Untitled Design   2026 10 23T165340.535

Untitled Design 2026 10 23T165340.535

Notices from the Economic Offences Wing to two of Sunetra Pawar’s associates : पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात नवी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या विकास पाटील आणि राम चौबे यांना आर्थिक गुन्हे शाखेने नोटिसा बजावल्याचे माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या नोटिसांनंतर संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका आणि ते तपास यंत्रणेला काय उत्तर देतात, याकडे लक्ष लागले आहे.

मुंढवा येथील सुमारे 40 एकर शासकीय जमिनीच्या व्यवहाराशी संबंधित प्रकरणात विकास पाटील आणि राम चौबे यांच्या भूमिकेची चौकशी होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे दोघेही यापूर्वी दिवंगत अजित पवार यांच्यासोबत काम करत होते. सध्या ते सुनेत्रा पवार यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले जाते. या जमीन व्यवहारात पुराव्यानिशी छेडछाड झाली का आणि संबंधित व्यक्तींनी प्रशासकीय पातळीवर कोणती भूमिका बजावली, याची तपास यंत्रणा पडताळणी करत असल्याचे वृत्त आहे. मात्र, या आरोपांबाबत अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.

मुंढवा जमीन प्रकरणाचा संबंध पार्थ पवार यांच्याशी संबंधित अमेडीया एंटरप्रायजेस एलएलपी या कंपनीशी जोडला जात आहे. शासकीय जमिनीच्या व्यवहारावरून हे प्रकरण चर्चेत आले होते. या प्रकरणात विकास पाटील आणि राम चौबे यांनी संबंधित व्यक्तींना मदत केली का, तसेच व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे आणि पुराव्यांबाबत त्यांची भूमिका काय होती, याची चौकशी होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

रामदास कदमांनी माझा नाद करू नये, मनोज जरांगेंचा घणाघात, व्हायरल ऑडिओ क्लिपवरून दिला थेट इशारा

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी यापूर्वी या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत आरोप केले होते. पार्थ पवार यांना मदत करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मध्यस्थी करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला होता. दरम्यान, या जमीन व्यवहाराशी संबंधित व्यक्ती आणि अधिकाऱ्यांमधील व्हॉट्सॲप संभाषणांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या संभाषणांतून व्यवहाराबाबत काही महत्त्वाचे धागेदोरे मिळतात का, याची तपास यंत्रणा पडताळणी करणार असल्याचे सांगितले जात आहे.

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असलेल्या तपासात संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. नोटिसांनंतर विकास पाटील आणि राम चौबे काय स्पष्टीकरण देतात, तसेच व्हॉट्सॲप संभाषण आणि इतर कागदपत्रांच्या तपासातून काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version