Tukaram Mundhe : महाप्रसादासाठी अधिकृत नोंदणी अनिवार्य; तुकाराम मुंढेंचा मोठा आदेश

Tukaram Mundhe : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात चर्चेत असणारे अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा विविध

Tukaram Mundhe

Tukaram Mundhe

Tukaram Mundhe : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात चर्चेत असणारे अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा विविध कार्यक्रमात वाटल्या जाणाऱ्या महाप्रसादाकडे वळवला आहे. अन्न व औषध विभागाकडून महाप्रसादासाठी नवीन नियम जारी करण्यात आले आहे. तुकराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाचे आयुक्तपद स्वीकारल्यापासून संपूर्ण राज्यात एफडीए मोठ्या प्रमाणात छापेमारी करत अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात जोरदार करावाई करताना दिसत आहे.

नुकतंच एफडीएकडून (Tukaram Mundhe) सुट्टे तेल विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर आता एफडीएने महाप्रसादासाठी देखील नवीन नियम जारी केले आहे.

एफडीएकडून (FDA) देण्यात आलेल्या माहितीनुसार, महाप्रसादासाठी (Mahaprasad) आता अधिकृत परवाना किंवा नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. जर विनापरवाना महाप्रसाद आयोजित केल्यास आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच महाप्रसाद करत असताना स्वच्छता, मास्क, हातमोजे आणि आरओचं पाणी देणे बंधनकारक असणार आहे.

याचबरोबर अन्नाचा दर्जा, स्वच्छतेसाठी एफडीएच्या अटी पाळणे देखील बंधनकारक असणार आहे. जर शिळे अन्न भाविकांना वाटप केल्यास आयोजकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एफडीएकडून देण्यात आली आहे.

जपानमध्ये 5.9 तीव्रतेचा भूकंप, 23 जण जखमी; टोकियोमध्ये अंधार –

महाप्रसादाचे अन्न साठवण्यासाठी आणि वाटपासाठी केवळ स्टेनलेस स्टील आणि अन्नसुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षित असलेल्या भांड्याचाच वापर आता आयोजकांना करावा लागणार आहे. याचबरोबर आयोजकांसाठी एफडीएने नोंदणी प्रक्रिया देखील अत्यंत सुलभ केली असून शंभऱ रुपयात ऑनलाईन नोंदणी पद्धतीने परवाना प्राप्त होणार असल्याची देखील माहिती एफडीएकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version