Download App

भाजपा कार्यकारिणी अन् नाशिककरांना आठवलं स्मार्ट सिटीचं आश्वासन

प्रफुल्ल साळुंखे

नाशिक : पाच वर्षापूर्वी भाजप (BJP ) सरकारच्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाशिक शहर विकासासाठी दत्तक घेतले होते. त्यावेळी नाशिक (Nashik ) महापालिकेच्या निवडणुका होत्या, आता निवडणुकाही आल्या आहेत आणि भाजप कार्यकारिणी निमित्ताने देवेंद्र फडणवीस देखील नाशकात आले आहे. यानिमित्ताने नाशिककरांना या घोषणाची आठवण झाली.

भाजप सरकार सत्तेत असताना नाशिक शहराची धुरा देवेंद्र फडणवीस यांनी आपले विश्वासू आणि संकटमोचक गिरीश महाजन यांच्यावर सोपवली होती. जळगाव आणि नाशिक असे दोन्ही पालकमंत्री पद असलेले गिरीश महाजन यांनी देखील जळगावपेक्षा नाशिकला अधिक प्रेम दिले. या काळात कुंभ मेळाच नियोजन देखील यशस्वी करुन दाखवले. हे नियोजन पाहून देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक विकासासाठी दत्तक घेतले.

नाशिक महापालिका निवडणुकीच्या काळात भाजपने खूप आश्वासन दिले. या बदल्यात नाशिककरांनी भाजपला सत्तेत बसवले. टायकर लेस मेट्रो, स्मार्ट सीटी, आयटी पार्क, लॉजेस्टिक पार्क, गोदावरी नदी शुद्धीकरण आणि सुशोभिकरण करणारा गोदा प्रकल्प असे अनेक प्रकल्पाची घोषणा झाली. पण हे प्रकल्प केवळ घोषणा होऊन कागदावरच राहिले. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे काम भाजपाच्या नेत्याने घेतल. हे काम करताना संपूर्ण शहराचे रस्ते खोदण्यात आला. यामुळे नाशिककर त्रस्त आहे. ड्रेनेज विस्तारीकरण योजना ठप्प आहे.

गेल्या काळात भाजपमध्ये झालेल्या अंर्तगत वादात गिरीश महाजन यांच्याकडून नाशिकची जबाबदारी काढून घेतली. ती जबाबदारी जयकुमार रावल यांच्याकडे देण्यात आली. या वादात महापालिकेचं वरचढ कोण या नादात स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक यांच्यावर कुणाचा वचक राहिला नाही. शहर बकाल होत गेल. कालांतराने महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार सत्तेत आले. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) पालकमंत्री झाले हे सारे प्रकल्प गुंडाळले.

आता पुन्हा भाजप सरकार आले, पण गिरीश महाजन (Girish Mahajan) अथक प्रयत्न करुन देखील पालकमंत्री होऊ शकले नाहीत. आता ही धुरा शिंदे गटाचे नेते दादा भूसे यांच्याकडे आली आहे. पण ग्रामीण भाग वगळता भूसे यांनी नाशिककडे लक्ष दिले नाही. शहरसाठी काय केले याचे आरोप- प्रत्यरोप होणे, विरोधी पक्ष असलेल्या उद्भव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून अपेक्षित होते, पण हा गट फोडून काढण्याच काम दादा भूसे आणि भाजपने सुरु केल आहे. विकासाने प्रश्न सुटत नाही. ते पक्ष फोडफाडीने भाजपाला साध्य करायचा का ? असा सवाल उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यानी केला. आज भाजप कार्यकारिणीच्या निमित्ताने नाशिकरांना सर्व आठवणीना उजळा दिला हे मात्र नक्की.

Tags

follow us