Uddhav Thackeray : मार्मिक साप्ताहिकाच्या वर्धापन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आजचा जमाना असा आहे, की वर्गणीदार आमच्याकडे जास्त आहेत म्हणून मार्मिक आमचा, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पूर्वी मुंबईमध्ये मराठी माणसांना नोकऱ्या मिळत नव्हते. त्यामुळे अनेक मराठी माणूस मुंबई सोडून जायला लागले होते मात्र शिवसेनेच्या ताकदीमुळे मुंबईत मराठी माणूस टिकला आणि वाचला असं उद्धव ठाकरे म्हणाले. माझ्या आजोबांनी शिवसेना असं नाव दिलं आणि बाळासाहेबांनी संघटनेची स्थापना केली. मी हे सगळं का सांगतोय, इथं असं सांगितले की जास्तीत जास्त वर्गणीदार वाढवा परंतु आताच जमाना असा आहे की वर्गणीदार जास्त म्हणून मार्मिक आमचा असा कोणी तरी कायतरी करण्याचा प्रयत्न करेल, असं होऊ शकतो असा टोला उद्धव ठाकरे यांनी नाव न घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लावला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हल्ली डेस्टिनेशन मॅरेज हा एक प्रकार आला आहे. एखादं हॉटेल बुक करतो, 100 टक्के हॉटेल बुक करतात आणि त्यानंतर कुणी दावा करतो या हॉटेलचा मालक मी आहे. अशी सगळी लाचारी सुरू झाली आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्याकाळी माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लढलेले होते. शिवसेनाप्रमुख, माझे काका, आचार्य अत्रे समोर अन्याय सुरू असताना स्वस्थ कसं बसू शकत होते. मग हे सगळे एकत्र आले आली तेव्हा शिवसेनेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर वाचा आणि थंड बसा हे शीर्षक वाचा आणि उठा असं झालं असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
इस्रायलवर पुन्हा हल्ला, हमासने डागले M90 Rocket, जाणून घ्या ‘या’ रॉकेटबद्दल सर्वकाही
तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर देखील हल्लाबोल केला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्या मशालीची धग दिल्लीतील दोघांच्या बुडाला लावायची आहे. दिल्लीत जाऊन बसलात आणि आम्हाला लाथा मारत असतील तर तंगड्या खेचून खाली आणणार असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा नाव न घेता इशारा दिला.