‘संजय राऊतांच्या स्टाईलने बोलाल तर उत्तरंही..,’; केसरकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
Deepak kesarkar On Udhav Thackeray : संजय राऊत यांच्या स्टाईलने बोलला तर उत्तरंही तशीच येणार असल्याचा खोचक टोला मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला. ते सिंधुदूर्गमधून बोलत होते.
कर्जबाजारी पाकिस्तान! सोळा वर्षात 11 पटीने वाढलं कर्ज; आकडा ऐकून बसेल धक्का
केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर चिखलफेक होऊ नये, असं मला वाटतं. पण उद्धव ठाकरेंची वक्तव्ये पाहिली तर लोकांचाही उद्रेक वाढतो. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत स्टाईलने बोलण्याचं बंद कराव मग हे सगळं थंड होईल. ठाकरे संजय राऊतांच्य स्टाईलने बोलायला लागले तर समोरुन उत्तरंही तशीच येणार आहेत, हे ठाकरे घराण्याला शोभणारं नसल्याचंही दीपक केसरकरांनी स्पष्ट केलंय.
तसेच उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम समाजाची मते घेतली आहेत. आता वक्फ बोर्डाचा ठराव आला की सगळे पळून गेले आहेत. ते सर्वजण ठाकरे यांनाच शोधत आहेत. कारण हिंदूंनी ठाकरेंना मते दिलेली नाहीत, या समाजाने दिली आहेत त्यामुळे उत्तर मागण्यासाठी ते लोकं शोधत असून पाण्यात त्यांना तेच दिसत असल्याची टीका दीपक केसरकर यांनी केलीयं.
बांग्लादेशातील कोणतं बेट मागत होता अमेरिका? नकार देताच शेख हसीनांचं सरकारच गेलं
यावेळी बोलताना केसरकरांनी ठाकरे यांच्या वक्तव्यांना आपल्या स्टाईलने उत्तर दिल्याचं दिसून आलं आहे. उद्धव ठाकरेंनी एकतर तू राहशील किंवा मी असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. त्यावर बोलताना केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री आपलाच राहिला पाहिजे असं उद्धव ठाकरेंचं आहे. त्यामुळे आदित्य एकतर तू रहा किंवा मी राहिल असं ते आदित्य ठाकरेंना उद्देशून म्हणाले असावेत, अशा शेलक्या शब्दांत केसरांनी प्रत्युत्तर दिलंय.
राज ठाकरेंकडे आमदार नाही पण ते लोकनेते:
राज ठाकरेंकडे किती आमदार हे महत्वाचं नाही ते लोकनेते आहेत. राज ठाकरेंच्या सभेला लाखोंच्या संख्येने लोकं येतात. उद्धव ठाकरेंच्या सभेला हजारोने येतात हाच फरक आहे. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांकडे जनतेचे प्रश्न घेऊन गेले ते सर्व प्रश्न सुटले आहेत कारण ते राज ठाकरे आहेत दुसऱ्या कोणाला हा प्रतिसाद मिळू शकतो का? राज ठाकरेंनी पहिल्याचं निवडणुकीत 12 आमदार निवडून आणले होते हे विसरुन चालणार नाही
कोणाचा कमीपणा करु नका हे महाराष्ट्राच्या ख्यातील न शोभणारं असल्याचं दीपक केसरकरांनी स्पष्ट केलंय.