‘अब्दाली खेचरांना’ मी पाण्यात दिसतो! ‘ते तूम्हालाच शोधतात’, ठाकरेंचा वार केसरकरांचा पलटवार
Deepak Kesrakar On Udhav Thackeray : अब्दाली खेचरं तुम्हालाच शोधत आहेत, तुम्ही त्यांची मते घेतली आता वक्फ बोर्ड ठरावावेळी तुम्ही पळून गेल्याने तुम्हालाच शोधत असल्याचा पलटवार मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्यावर केलायं. दरम्यान, ठाण्यात आयोजित सभेतून उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यानंतर आज केसरकर यांनी पलटवार केलायं. ते सिंधुदूर्गमध्ये बोलत होते.
दीपक केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम समाजाची मते घेतली आहेत. आता वक्फ बोर्डाचा ठराव आला की सगळे पळून गेले आहेत. ते सर्वजण ठाकरे यांनाच शोधत आहेत. कारण हिंदूंनी ठाकरेंना मते दिलेली नाहीत, या समाजाने दिली आहेत त्यामुळे उत्तर मागण्यासाठी ते लोकं शोधत असून पाण्यात त्यांना तेच दिसत असल्याची टीका दीपक केसरकर यांनी केलीयं.
बांग्लादेशातील कोणतं बेट मागत होता अमेरिका? नकार देताच शेख हसीनांचं सरकारच गेलं
यावेळी बोलताना केसरकरांनी ठाकरे यांच्या वक्तव्यांना आपल्या स्टाईलने उत्तर दिल्याचं दिसून आलं आहे. उद्धव ठाकरेंनी एकतर तू राहशील किंवा मी असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. त्यावर बोलताना केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री आपलाच राहिला पाहिजे असं उद्धव ठाकरेंचं आहे. त्यामुळे आदित्य एकतर तू रहा किंवा मी राहिल असं ते आदित्य ठाकरेंना उद्देशून म्हणाले असावेत, अशा शेलक्या शब्दांत केसरांनी प्रत्युत्तर दिलंय.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
छत्रपती शिवाजी महाराजांनंतरसुद्धा औरंगजेब महाराष्ट्रावर जेव्हा चालून आला तेव्हा त्याच्या सैन्यांच्या घोड्यांना पाणी पिताना देखील पाण्यात संताजी धनाजी दिसायचे. तसेच या अब्दालीच्या खेचरांना पाण्यात उद्धव ठाकरे दिसतात. पण तुम्ही अजून महाराष्ट्राचं पाणी जोखलेलं नाही. महाराष्ट्राने अजून तुम्हाला पूर्ण पाणी पाजलेलं नाही. हा सामना होऊ द्या मग त्यांना महाराष्ट्राचं पाणी काय असतं ते शिवसेना दाखवून देईल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला होता.