Download App

संभाजी भिडेच्या तोंडाला काळं फासा अन् 1 लाख जिंका, काँग्रेसची घोषणा…

sambhaji bhide contraversy : संभाजी भिडेंची मिशी कापण्याचं जाहीर झाल्यानंतर आता संभाजी भिडे यांच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. अमरावतीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन वादंग पेटलं आहे. राज्यातील ठिकठिकाणई त्यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे. अशातच आता बीड काँग्रेसकडूनही भिडेंच्या विधानाचा निषेध व्यक्त करीत भिडेंच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.

आयआयटी बॉम्बेच्या निर्णयाने खळबळ; मांसाहारी विद्यार्थ्यांना कॅन्टीनमध्ये प्रवेश नाकारला

बीडमध्ये संभाजी भिडे यांच्या विरोधात काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले हाेते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार निदर्शने करत संभाजी भिडे यांच्या फोटोला जोडे मारून प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला. मागील काही दिवसांपासून शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांचा राज्यभर दौरा सुरु आहे. या दौऱ्यात विविध कार्यक्रमांना संभाजी भिडे हजेरी लावून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत आहेत. अमरावतीतल्या एका कार्यक्रमातही ते मार्गदर्शन करीत होते. त्याचवेळी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे.

‘मंत्रीपद नसल्याने हा माणूस बिथरला’; ठाकरे गटाचा नेता शिरसाटांवर भडकला

भिडेंनी गांधींबद्दल केलेल्या विधानानंतर विरोधकांसह सामाजिक संघटनांकडून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. तर दुसरीकडे संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी सातत्याने विरोधकांकडून केली जात आहे. अमरावतीच्या काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी भिडेंचा खरपूस समाचार घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनीही टीका करीत स्वत: ठाण्याच्या पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन भिडेंवर गुन्हा दाखल केला आहे.

त्यामुळे आता विरोधकांच्या मागणीनंतर संभाजी भिडे यांच्यावर अमरावती, ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अद्याप पोलिसांकडू त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. महात्मा गांधींसह इतर महापुरुषांवरही भिडेंनी वक्तव्य केल्याने भिडे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिस त्यांना अटक कधी करणार का? असा प्रश्न विरोधकांकडून केला जात आहे.

Tags

follow us