महाविकास आघाडीतील एक पक्ष MIM सोबत युतीसाठी तयार, इम्तियाज जलील यांचा दावा

Imtiaz Jaleel On MVA : राज्यात अनेक वर्षांपासून रखडलेल्या 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जारी करताच

Imtiaz Jaleel On MVA

Imtiaz Jaleel On MVA

Imtiaz Jaleel On MVA : राज्यात अनेक वर्षांपासून रखडलेल्या 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जारी करताच युती आणि आघाडीसाठी प्रत्येक पक्ष जोर लावताना दिसत आहे. 29 महानगरपालिकांपैकी काही ठिकाणी महायुतीमधील घटकपक्ष भाजप आणि शिवसेना एकत्र म्हणून निवडणूक लढवणार आहे तर काही ठिकाणी एकमेकांविरोधात निवडणूक लढवणार आहे.  तर महाविकास आघाडी देखील काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

तर दुसरीकडे एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. महानगरपालिकेसाठी महाविकास आघाडीमधील एक पक्ष एमआयएमसोबत युती करण्यास तयार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना दिल्याने आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तसेच एमआयएम (AIMIM) 29 पैकी 27 महानगरपालिकांमध्ये निवडणूक लढवणार असल्याची देखील माहिती इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी दिली आहे.

स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीमधील एक पक्षाने आमच्यासोबत युती करण्याची इच्छा दाखवली होती मात्र आमची ताकद असणाऱ्या जागांवर त्यांनी दावा केल्याने आम्ही युतीसाठी नकार दिला अशी माहिती माजी खासदार आणि एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला एमआयएम ऑफर देते हे दुर्दैवी आहे असं शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी म्हटले आहे.

तसेच एमआयएमला ठाकरे गटाने युतीसाठी ऑफर दिली असा दावा देखील संजय शिरसाट यांनी केला आहे. तर आम्ही हिंदुत्वादी आहोत आमची आणि एमआयएमची विचारसरणी वेगळी आहे असं म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना प्रत्युत्तर दिले आहे.

ठाणे पालिकेत अजितदादा स्वबळावर

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी महायुती म्हणून भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र निवडणूक लढवार आहे मात्र या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केल्याने राज्यातील राजकारणा अनेत चर्चांना उधाण आले आहे.

मेक्सिकोमध्ये भीषण विमान अपघात; इमर्जन्सी लँडिंग दरम्यान जेट इमारतीवर आदळले, 7 जणांचा मृत्यू

Exit mobile version