कुंभमेळ्यासाठी केल्या जाणाऱ्या अमाप खर्चावरून इम्तियाज जलील यांच्याकडून राज्य सरकारवर आगपाखड
कुंभमेळ्यासाठी 25 हजार कोटी रुपयांचा निधी दिला गेला. ठीक आहे तुमचा उत्सव आहे, पण एवढा निधी कशाला? - इम्तियाज जलील
Imtiaz Jaleel’s angry question from Nashik : नाशिकच्या तपोवनात होणार कुंभमेळा(Kumbhmela) सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. तपोवनमध्ये होणाऱ्या वृक्षतोडीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. आता एमआयएमचे(MIM) प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील(Imtiyaz Jaleel) यांनी देखील नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावर भाष्य केलं आहे. कुंभमेळ्यासाठी 25 हजार कोटी रुपयांचा निधी दिला गेला. ठीक आहे तुमचा उत्सव आहे, पण एवढा निधी कशाला? असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले की, एवढ्या सगळ्या पैशांत देशात किती शाळा(School) आणि हॉस्पिटल(Hospital) होतील. अशा परखड शब्दांत त्यांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
तर मी फडणवीस(Devendra Fadanvis) यांचं इना, एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांचं मीना आणि अजित पवार(Ajit Pawar) यांचं नाव डिका असं ठेवलं आहे. अजित पवार यांना मतदान म्हणजे भाजपला(BJP) मतदान, असा घणाघात देखील यावेळी त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे बिहारमध्ये आपले 5 आमदार निवडून आले. काँग्रेवाले म्हणाले हैद्राबादमधून ओवैसी येत आहेत. तुमची मम्मी कुटून आली? असा सवाल विचारात त्यांनी काँग्रेससह सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधलाय. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नाशिकमध्ये एमआयएमची जाहीर सभा पार पडली, यावेळी ते बोलत होते.
मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे ‘रेहमान डकैत’ कोण..? शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला
सभेला संबोधित करत असताना जलील पुढे म्हणाले की, मी येथे मोटारसायकलवर पोहोचलो आहे. तपोवनमध्ये झाडं कापली जात आहेत. शर्माच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल केली जात आहे. कुंभमेळ्यासाठी 25 हजार कोटी रुपयांचा निधी दिला गेला. ठीक आहे, तुमचा उत्सव आहे, पण एवढा कशाला? मी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी जमीन दिली होती. या राज्यात काही लोक होते जे सर्व धर्म आणि समाजासोबत चालत होते. यात विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे होते. श्रद्धांजली द्यायची असेल तर हॉस्पिटल किंवा शाळा बनवा, स्मारक नाही.
भाजपच्या नेत्याचं जे स्मारक बनवलं जात होतं. मी त्या विरोधात कोर्टात गेलो, ज्या ठिकाणी स्मारक होत आहे. त्या ठिकाणी हॉस्पिटल बनवा असे सांगितले. ज्या ठिकाणी भाजप नेत्याचे स्मारक बनत होते, आता त्या ठिकाणी चारशे बेडचे हॉस्पिटल आहे. फडणवीस ,अजित पवार ,एकनाथ शिंदे हा देश सर्व धर्म समभाव आहे. जे 25 हजार कोटी रुपये देत आहे. त्यात देशात किती शाळा आणि हॉस्पिटल होतील, असे म्हणत त्यांनी कुंभमेळ्याच्या निधीवरून राज्य सरकारवर टीका केली.
पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शशिकांत शिंदे स्पष्टच बोलले
इम्तियाज जलील पुढे म्हणाले की, आपल्याला शिक्षणावर लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याला लक्ष्य केले जात आहे. रोज दर्गा, मशिदी लक्ष्य केल्या जात आहेत. रोज एकाचे घर कुठल्या न कुठल्या राज्यात पाडले जात आहे. या देशात आपल्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे. भाजपने ठरवले आहे की, आपल्याला यांच्याशी काही घेणे देणे नाही. रोज एक मंत्री आपल्या धर्मावर टोपी आणि दाढीवर बोलत आहे. 1947 मध्ये आपल्या पूर्वजांना विचारले कुठे जाणार? आपण इथे जन्मलो असे सांगितले. कोणी काही बोलले तर आपल्याला ऐकावे लागत आहे. आपण एवढ्या वर्षापासून ऐकत आहे. पण, आता ज्या शब्दात बोलणार त्या शब्दात उत्तर देणार, असा इशारा त्यांनी दिला.
