Download App

अवकाळीचा फटका! अहिल्यानगर जिल्ह्यात कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी

Farmers Loss Due To Unseasonal Rain In Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली (Ahilyanagar News) आहे. परंतु याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतोय. अवकाळी पावसामुळे (unseasonal rain) कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. भिजलेल्या कांद्याला व्यापारी घेत नाही. तसेच कांद्याला भाव नसल्याने उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने बळीराजा अक्षरशः हवालदिल झाला (Onion farmers loss) आहे. शेतीमध्ये पावसामुळे नुकसान झाले, मात्र प्रशासनाकडून पंचनामे देखील केली जात नसल्याने बळीराजावर दुहेरी संकट ओढवले गेले आहे.

अवकाळी पाऊस आणि कांद्याच्या दरात घसरणीमुळे राज्यातील अनेक कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अवकाळी पावसामुळे कांदा खराब झाला, तर कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले (Ahilyanagar News) आहे. अशीच काहीशी परिस्थिती नगर जिल्ह्यात देखील निर्माण झाली आहे. राज्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले असल्याने कांद्याला अपेक्षित असा भाव मिळत नाही. यातच अवकाळी मुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे.

यावेळी बोलताना शेतकरी म्हणाले, पावसामुळे कांदा सडला असून यामुळे त्याला बाजारभाव मिळेना. दरम्यान प्रशासनाकडून पहिल्याच नुकसानीची भरपाई मिळाली नाही, तर याची कोठे मिळणार अशा शब्दांत शेतकऱ्यांनी प्रशासनावर जाहीर नाराजी (Ahilyanagar Rain) व्यक्त केली. कांद्याला चांगला भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्च देखील वसूल झालेला नाही. त्यामुळे कवडीमोल किंमतीत कांद्याची विक्री करावी लागत आहे. तसेच साठवणूक करण्यास पर्याय उपल्बध नसल्याचे देखील शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.

यावर बोलताना कांदा नेप्ती उत्पन्न बाजार समितीचे सहसचिव संजय काळे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून घेण्यात आले आहे. मात्र बाजार समितीमध्ये कांद्याला अपेक्षित असा बाजार भाव मिळत नसल्याने त्याची आवक घटली आहे. उत्पादन खर्च भरून निघत नसल्याने शेतकऱ्यांनी देखील कांदा साठवणुकीवर भर दिला आहे. यामुळे बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली आहे.

येणाऱ्या काळात भाव वाढतील अन् कांदा मार्केटमध्ये घेऊन येऊ अशी शेतकऱ्यांची मानसिकता आहे. मात्र ज्यांच्याकडे साठवणूक करण्यासाठी जागेची उपलब्धता नाही, ते कांदा विक्रीस घेऊन येत आहे. सध्या सगळ्यात लहान अशा कांद्याला 200 ते 250 रुपये भाव मिळत आहे, तर मोठ्या स्वरूपाच्या कांद्याला 1300 ते 1500 असा भाव मिळत आहे. दरम्यान गेल्या वर्षभरात कांद्याची आवक चांगली राहिली. मात्र फेब्रुवारीपासून आवक घटली आहे. बाजारभाव मिळू लागला की पुन्हा एकदा आवक वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कांदा साठवणुकीतील अडचणी

मे महिन्यातील अवकाळी पावसाने जिल्ह्यातील अनेक परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. चांगला भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी कांदा चाळींमध्ये साठवून ठेवला होता, पण सततच्या पावसामुळे आणि वातावरणातील आर्द्रतेमुळे कांद्याला बुरशी लागण्याचा धोका वाढला आहे. कांदा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना चाळीतील कांदा बाहेर काढून निवडून पुन्हा साठवावा लागत आहे. ही प्रक्रिया खर्चिक आहे, कारण मजुरांचे दर वाढलेले आहेत. यामुळे कांदा साठवणुकीमध्ये देखील अडचण येत आहे.

follow us