Unseasonal Rain : पुन्हा अवकाळीचं संकट! राज्यात ‘या’ ठिकाणी थंडीत बरसणार पाऊस

Unseasonal Rain : पुन्हा अवकाळीचं संकट! राज्यात ‘या’ ठिकाणी थंडीत बरसणार पाऊस

Unseasonal Rain in Maharashtra : राज्यात पावसाने विश्रांती घेऊन कडाक्याची थंडी पडलेली असतानाच पुन्हा अवकाळी पावसाचं (Unseasonal Rain) संकट राज्यावर घोंगावू लागलं आहे. विदर्भात येत्या काही दिवसात थंडीचा जोर वाढणार आहे तसेच पावसाचीही शक्यता हवामान विभागाने (Weather Update) व्यक्त केली आहे. राज्यात काही भागात पाऊस होईल अशी चिन्हे दिस आहेत. या पावसाचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही दिवसात पाऊस होईल, अशी शक्यता आहे.

Weather Update : राज्याला भरली हुडहुडी! पुढील 5 दिवसांत ‘या’ राज्यांत थंडीची लाट; रेड अलर्ट जारी

उत्तर भारतातील या हवामानाचा फटका महाराष्ट्रात बसत आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांत गारठ्यात वाढ झाली आहे. पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे अशी परिस्थिती असताना पावसाचा तडाखाही बसणार आहे. सध्या नगर शहरात थंडी वाढली आहे. नगरमध्ये इतकी थंडी कधीच पडत नाही. परंतु, सध्या हवामान बदलाचा अनुभव नगरकर घेत असून कडाक्याची थंडी पडली आहे. त्यात आता काही जिल्ह्यांत पावसाचाही इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 5 जानेवारीपासून दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ, लक्षद्वीपसह दक्षिण भारतात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज होता. तसा या राज्यांत पाऊस झाला.  या पावसामुळे आतापासूनच ढगाळ हवामान होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राप्रमाणेच या राज्यांतही पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Maharashtra Weather Update : आज राज्यात तापमान घटणार; हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube