Weather Update : राज्याला भरली हुडहुडी! पुढील 5 दिवसांत ‘या’ राज्यांत थंडीची लाट; रेड अलर्ट जारी
Weather Update : अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर राज्यात आणि देशात थंडीचा (Weather Update) कडाका वाढत चालला आहे. उत्तर भारतातील राज्यांत थंडीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांत गारठ्यात वाढ झाली आहे. पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे. हवामान विभागाने अनेक राज्यांना थंडीचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील चार दिवसात महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच काही भागात पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Weather Update : थंडी पळाली! 31 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; हवामानाचा अंदाज काय?
पुण्यात अनेक विमान उड्डाणे रद्द
उत्तर भारतातील या हवामानाचा फटका महाराष्ट्रात बसत आहे. काल मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात येणारी आणि जाणारी 17 विमाने रद्द करण्यात आली. दिल्लीला जाणाऱ्या आणि दिल्लीवरून येणाऱ्या विमानांचा रद्द झालेल्या विमानांत समावेश आहे. मागील तीन दिवसांपासून पुण्यात येणारी आणि येथून बाहेर जाणारी अशी एकूण 50 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
दक्षिण भारतात पावसाचा अंदाज
खासगी हवामान एजन्सी स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार,श्रीलंका आणि जवळच्या काही भागात चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील 48 तासांत अंदमान निकोबार बेटांवर पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू, केरळमध्येही पाऊस होईल असा अंदाज आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, लद्दाख, उत्तराखंड या राज्यांत आज आणि उद्या हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल अशी शक्यता आहे.
Weather Update : अवकाळीचं संकट कायम! पुढील 24 तासांत ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार
याशिवाय जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, दक्षिण भारतात तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे, किनारी आंध्र प्रदेश, यानाम, रायलसीमा आणि दक्षिण कर्नाटकमध्ये, ईशान्य मोसमी वारे थांबण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत या भागात मुसळधार पावसाची शक्यता (रेन अलर्ट) आहे. केरळ आणि लक्षद्वीपमध्ये कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. आज आणि उद्या दक्षिण तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.