Weather Update : थंडी पळाली! 31 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; हवामानाचा अंदाज काय?

Weather Update : थंडी पळाली! 31 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; हवामानाचा अंदाज काय?

Weather Update : सध्या राज्यातील जनता हवामान बदलाचा अनुभव घेत आहे. या बदलामुळे थंडी (Weather Update) अचानक गायब झाली असून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अजूनही पावसाचा अंदाज कायम असून आज हवामान विभागाने नवा इशारा दिला आहे. देशातील 31 जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस (Rain Alert) होईल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. अवकाळीचा मुक्काम वाढल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत. स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागात आज आणि उद्या हलका पाऊस होईल. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक भागात पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि अरुणाचल प्रदेशातील काही जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसणार आहे.

मध्य प्रदेश राज्यातील खरगोन, खंडवा, झाबुआ, इंदूर, धार, बुऱ्हाणपूर, बरवानी, मंदसौर, नीमच या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रतलाम, ग्वाल्हेरसह आणखी काही जिल्ह्यांत गारपीटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासह देशातील आणखी काही राज्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. पिकांचे नुकसान होत असून बळीराजा संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत सरकारने मदत देण्याची मागणी होत आहे.

हा पाऊस अवकाळी असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा फटका पिकांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबई आणि पुण्यात पाऊस होईल अशी शक्यता नाही. पुण्यात मात्र आज ढगाळ वातावरण राहू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नगर शहरात मागील दोन दिवसांपासून पाऊस होत आहे. काल पावसाने विश्रांती घेतली होती.

Unseasonal Rain : राज्यावर पुन्हा अवकाळीचं सावट! ‘या’ जिल्ह्यांत पाऊस लावणार हजेरी

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 5 जानेवारीपासून दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ, लक्षद्वीपसह दक्षिण भारतात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला होता. हा अंदाज खरा ठरला असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच दक्षिण भारतात पावसाने जोर धरला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांत आज आणि उद्या हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पावसामुळे आतापासूनच ढगाळ हवामान होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राप्रमाणेच या राज्यांतही पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज