Operation Tiger : ऑपरेशन टायगर 3, भास्कर जाधव सोडणार ठाकरेंची साथ? उदय सामंत म्हणाले…

Operation Tiger : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव लवकरच ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात

Operation Tiger

Operation Tiger

Operation Tiger : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव लवकरच ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. ऑपरेशन टायगर 3 ची चर्चा सुरु असताना भास्कर जाधव यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांची भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर 2 राबवत ठाकरे गटाचे सहा खासदार फोडले होते तर आता काही आमदार देखील शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे भास्कर जाधव यांच्याशी झालेल्या भेटीवर माध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी भास्कर जाधव राजकारणात आपल्यापेक्षा जास्त अनुभवी आहे. त्यांना असा काही निर्णय घ्यायचा असेल तर ते योग्य वेळी घेतील असे सूचक विधान केल्याने भास्कर जाधव लवकरच ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

माध्यमांशी बोलताना उदय सामंत (Uday Samant) म्हणाले की, भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि माझी जवळीक जर वाढली असेत तर तुम्हाला (पत्रकारांना) त्याची काय अडचण आहे का? तुमचा काही प्रॉब्लेम आहे का? मी त्यांच्या जवळ जाऊ नये असे तुम्हाला वाटते का? आपण एखाद्याच्या मांडीला मांडी लावून बसलो म्हणजे ती व्यक्ती माझ्या सर्वच बाबी ऐकेल किंवा मी तिचे ऐकावे असे राजकारणात होत नाही. राज्यातील रत्नागिरी जिल्हा हा राजकारणातील अतिशय सुसंस्कृत जिल्हा आहे. एखाद्या कार्यक्रमाला आम्ही एकत्र आलो आणि एकमेकांचे कौतुक केले तर कोणाच्या पोटात का दुखते हेच कळत नाही असं उदय सामंत म्हणाले.

पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले की, काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. भास्कर जाधव हे आपल्यापेक्षा राजकारणात अनुभवी आहे. त्यांना असा काही निर्णय (ठाकरे गटाची साथ सोडण्याचा) घ्यायचा असेल तर ते योग्य वेळी घेतील.

सातारानंतर सांगलीतही भाजपला धक्का; जिल्हा बँकेवर काँग्रेसचा झेंडा, महेंद्र लाड अध्यक्षपदी

ऑपरेशन टायगर 2 अंतर्गत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 9 पैकी 6 खासदारांनी पक्षाची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता.

Exit mobile version