Download App

“आमच्या राजू पाटील यांना विचारायचं आहे, घेता का?” निवडणूक आयोगाच्या निकालावर राज ठाकरे म्हणाले

  • Written By: Last Updated:

“राज्याच्या राजकारणात जे काही चालू आहे त्यावर येत्या गुडीपाडव्याच्या बोलणार असून, त्या दिवशी संपूर्ण सिनेमाचं दाखवणार आहे” असं वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी दिला आहे. राज ठाकरे यांनी आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी मराठी भाषा, पुस्तके, साहित्य यावर संवाद साधला पण राजकीय विषयावर येत्या गुढीपाडव्याला बोलणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

यावेळी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, “महाराष्ट्रात जे सुरु आहे. त्यावर मी २२ तारखेला गुढीपाडव्याला शिवतीर्थावर बोलणार आहे. मला आता ट्रेलर दाखवायचा नाही. २२ तारखेला सिनेमाच दाखवणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला. महाराष्ट्र असा कधीही नव्हता.” अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : Maharashtra Politics : ‘पाटलाच्या नावातचं गुलाब, पण वास धोतऱ्याचा”, वरळीच्या सभेत सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोल

…मग काय जळतं ते कळेल

काल निवडणूक आयोगाच्या निकाल पाहिला तर मनसेत राजू पाटील हे एकच आमदार आहे, मग त्यांचं कसं होईल, अशी टिप्पणी अजित पवार यांनी केली होती. त्यावर राज ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर थेट उत्तर देणं टाळलं पण पण “आमच्या राजू पाटील यांना विचारायचं आहे, घेता का, हातात घेऊन बघा, मग काय जळतं ते कळेल. दिवसरात्र आम्ही बर्नोल लावून असतो” असा खोचक टोलाही लगावला.

राज ठाकरे सामना वाचतात का ?

याच मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांना ते सामना आणि मार्मिक वाचतात का असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी मी सामना आणि मार्मिक वाचत नाही, असं म्हटले. पण दोन्ही माझ्याकडे दोन्ही येतात पण मी वाचत नाही. न्यूजचॅनलही पाहतच नाही. सोबत वर्तमानपत्रात हव्या तशा बातम्या आता येत नसल्याचा टोला देखील त्यांनी लगावला.

Tags

follow us