पंढरपूर : सध्या सर्वाधिक चर्चेत व लोकप्रिय असे एक नाव म्हणजे गौतमी पाटील (Gautami Patil ) होय. गौतमीचा डान्सचा कार्यक्रम म्हंटले की गोंधळ होणार हे समीकरण बनले आहे. असाच काहीसा प्रकार नुकताच तिच्या एका कार्यक्रमात पाहायला मिळाला आहे. पंढरपूर येथे तिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित तरुणांकडून हुल्लडबाजी करण्यात आल्याचा प्रकार घडला. यावेळी मग पोलिसांनी गर्दी कमी करण्यासाठी व परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी उपस्थित चाहत्यांना लाठीचा प्रसाद दिला त्यावेळी वातावरण निवळले.
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होते. तिला महाराष्ट्रभरातून कार्यक्रमाला बोलावलं जात आहे. गौतमीही आपल्या कार्यक्रमाचं नियोजन करत कार्यक्रमाला हजेरी लावत असते. नुकताच पंढरपुरमधील वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर यात्रा समितीच्या वतीनं वेळापूर येथील विराट पालखी मैदानावर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
गौतमीचा कार्यक्रम म्हटल्यावर संपूर्ण वेळापूर तिच्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी कार्यक्रमस्थळी हजर झाले. विशेष म्हणजे वेळापूरच नव्हे तर आजूबाजूच्या गावातील आणि तालुक्यातील अनेकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती. लोकांना बसायलाही जागा नव्हती. पब्लिक स्टेजवर येऊ नये आणि स्टेजला कोणतीही हानी पोहोचू नये म्हणून स्टेजभोवती बॅरिकेड्स लावण्यात आल्या होत्या.
Eknath Shinde : सावरकरांचे ‘हिंदुत्व’ बाळासाहेबांना प्राणाहून प्रिय… मुलगा मात्र अपमान सहन करतो!
गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आणि सुरु झाल्यानंतर लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं जात होतं. मात्र कार्यक्रम सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच गाण्याला प्रेक्षकांतून हुल्लडबाजी सुरू झाली. पोलिसांनी प्रेक्षकांना शांत ठेवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र हुल्लडबाजी सुरूच राहिल्यावर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करण्याची वेळ आली. गाणं मध्येच थांबवून पोलिसांनी प्रेक्षकांना शांतता बाळगण्याचं आवाहन केलं.
हनुमान जयंती विशेष: राज्यातील प्रसिद्ध मारुती मंदिरं
गौतमीच्या अदांवर चाहते फिदा
आजकाल महाराष्ट्रात गावोगावी मोठ्या संख्येने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला हजेरी लावली जात आहे. दिवसेंदिवस तिची लोकप्रियता वाढत चालली आहे. गौतमी पाटील हिला आता इतर राज्यातूनही कार्यक्रमासाठी मागणी येऊ लागली आहे. गौतमीच्या नखरेल अदाकारीवर अवघा महाराष्ट्र फिदा आहे.