हनुमान जयंती विशेष: राज्यातील प्रसिद्ध मारुती मंदिरे

हनुमान जयंती विशेष: राज्यातील प्रसिद्ध मारुती मंदिरे

मुंबई – आपल्या महाराष्ट्रात एकही गाव सापडणार नाही की जिथं हनुमान मंदीर (Lord Hanuman) नाही. हिंदु धर्मानुसार हनुमान हे शक्तीचं प्रतीक मानलं जातं. शंकराचा (lord Shankar) अकरावा रुद्र अवतार म्हणून ओळकल्या जाणाऱ्या हनुमान हा बळाचा अधिपती म्हणून प्रसिद्ध असला तरी ज्या भावाने हनुमंताची पुजा केली जाते त्या रुपात त्याची प्रचिती येते असेही म्हटले जाते. सतराव्या शतकात समर्थ रामदासांनी (Ramdas swami) हनुमानाच्या पूजेच्या निमित्ताने हुनमान मंदीरांची स्थापना केली आहे. आज आपण हनुमान जयंतीविशेष महाराष्ट्रातील प्रसिद्ध 12 मारुती मंदिरांची माहिती जाणून घेणार आहेत.

भद्रा मारुती (Bhadra Maruti)
खुलताबाद येथे झोपेच्या मुद्रेत भद्रा मारुतीची मुर्ती आहे. प्राचीन मंदिर एलोरा लेण्यांपासून अवघ्या 4 किमी अंतरावर आहे.

दुतोंड्या मारुती (Dutonya Maruti)
नाशिक मधील गोदावरी नदीत रामकुंड आणि नारोशंकर मंदिराच्या मध्यभागी दुतोंड्या मारुतीचे शिल्प 1942 च्या सुमारास उभारण्यात आले.

हेच राहिलं होतं; घर, गाडीनंतर आता आंब्यासाठी EMI

चाफळचा वीर मारुती (Chafal Veer Maruti)
समर्थ रामदासांनी इ.स.1649 मध्ये राममंदिरासमोर हात जोडलेल्या दास मारुतीची स्थापना केली.

प्रताप मारुती (Pratap Maruti)
चाफळच्याच श्रीराम मंदिरामागे अंदाजे 100 मीटर अंतरावर प्रताप मारुतीच्या मंदिराची स्थापना करण्यात आली होती.

माजगावचा मारुती (Majgaon Maruti)
चाफळपासून साधारण तीन किमी अंतरावर असलेल्या माजगाव येथे समर्थानी या हनुमान मंदिराची स्थापना केली आहे.

ट्विटरचा लोगो बदलण्याची रंजक कहाणी, इलॉन मस्क शब्दाला जागला

शिंगणवाडीचा बाल मारुती (Shinganwadi BalMaruti)
चाफळपासून अवघ्या एक किमी अंतरावर असलेल्या शिंगणवाडी या टेकडीवर 1650 मध्ये या मंदिराची बांधणी करण्यात आली.

मठातील मारुती (Mathatil Maruti)
उंब्रज गावच्या मठात इ.स. 1650 साली समर्थानी चुना, वाळू आणि ताग हे पदार्थ वापरून अंदाजे दोन फूट उंच अशी मारुती मूर्ती साकारली होती.

Bholaa Box Office Collection: अजयच्या ‘भोला’ची छप्परफाड कमाई, सहा दिवसांत ‘इतक्या’ कोटींची उलाढाल

मसूर गावचा हनुमंत (Masoorgao Hanuman)
उंब्रज पासून दहा किमी अंतरावर असलेल्या मसूर गावी इ.स. 1646 साली याची मारुतीची स्थापना समर्थानी केली.

शिराळयाचा उत्तराभिमुख हनुमान (Shiral Hanuman)
सांगली जिल्ह्यात सर्वाधिक नागांची संख्या असणाऱ्या शिराळे गावात 1655 साली समर्थानी हनुमंताची मूर्ती स्थापित केली आहे.

चुन्याचा मारुती (Chunyacha Maruti)
कराड- मसूर रस्त्यावरन 15 किमी अंतरावर असलेल्या शहापूर गावात समर्थानी 1645 साली 11 मारुतींपैकी सर्वात पहिल्या मंदिराची स्थापन केल्याचे मानले जाते.

पूर अडवणारा मारुती
सांगली जिल्ह्यात वाळवे तालुक्यातील बाहे बोरगाव या ठिकाणी इ.स. 1652 मध्ये समर्थानी या मंदिराचा पाया रचला.

मनपाडळेचे कौलारू मंदिर
पन्हाळगड परिसरात मनपाडळे या गावी अंदाजे इ.स.1652 मध्ये समर्थानी हनुमान मंदिराच्या रूपातील शक्तिकेंद्राची स्थापना केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube