श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट हायजॅक केला? पुनित बालन स्पष्टच म्हणाले

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट हायजॅक केला? पुनित बालन स्पष्टच म्हणाले

Punit Balan :  पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust) विश्वस्त, उत्सवप्रमुख व युवा उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांनी डिजेमुक्त गणेशोत्सव असा संकल्प केला आहे. याबाबत लेट्सअप मराठीशी (Letsupp Marathi) बोलताना आज पुण्यात (Pune) डिजेमुक्त गणेशोत्सवाची आवश्यकता का आहे याबाबत सांगितले. तसेच त्यांनी या वेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ हायजॅक करण्याच्या आरोपावर देखील स्पष्टीकरण दिले आहे.

लेट्सअप विशेष या कार्यक्रमात बोलताना उद्योजक पुनीत बालन म्हणाले की, आज मी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा उत्सवप्रमुख आणि विश्वस्त आहे. मंडळ हायजॅक कधी होतो जेव्हा एकदा माणूस मंडळाचा अध्यक्ष होतो मात्र मी या मंडळाचा अध्यक्ष नाही. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाला एक ऐतिहासिक वारसा आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे संस्थापक श्रीमंत भाऊसाहेब यांनी 1892 ला सर्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. त्यांच्यासोबत लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाचा प्रचार केला. भाऊसाहेब एक क्रांतिकारी होते. त्यांचा एक वाडा देखील आहे. मी जेव्हा या मंडळात आलो तेव्हा वाडाच्याची परिस्थिती चांगली नव्हती मात्र कोविडनंतर आम्ही वाडा दुरुस्त केला आणि आज या वाड्याला पाहण्यासाठी संपूर्ण जगातून लोक येत आहे. त्यामुळे मंडळाला चांगल्या पद्धतीने प्रोजेक्ट करणे किंवा सांभाळणे याला आम्ही हायजॅक म्हणत नाही. असं लेट्सअप मराठीशी बोलताना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त, उत्सवप्रमुख व युवा उद्योजक पुनीत बालन म्हणाले.

कुराण वाचा, अरबी शिका अन् इस्लामला जाणून घ्या; नेतान्याहूचा नवा आदेश 

डिजेमुक्त गणेशोत्सव आवश्यक : पुनीत बालन

तसेच लोकांनी स्वातंत्र्यलढ्यात एकत्र यावे यासाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य टिळकांनी देशात गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. त्यावेळी लोक एकत्र जमा होऊन आनंदाने संस्कृतीला शोभेल आणि धर्माप्रमाणे गणेशोत्सव साजरा करत होते मात्र 2022 नंतर गणेशोत्सवात डिजेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. संस्कृतीला शोभणारी आज गणेशोत्सव साजरे होत नाही. डिजेचा नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे आता डिजेमुक्त गणेशोत्सव आवश्यक आहे. असं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त, उत्सवप्रमुख व युवा उद्योजक पुनीत बालन म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube