कुराण वाचा, अरबी शिका अन् इस्लामला जाणून घ्या; नेतान्याहूचा नवा आदेश

Benjamin Netanyahu : इस्त्रायचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्त्रायली सैन्याला आणि सर्व गुप्तचर अधिकाऱ्यांना कुराण वाचण्याचे आणि इस्लाम शिकण्याचे आदेश दिले आहे. माहितीनुसार, पंतप्रधान नेतन्याहू यांनी आपल्या सर्व गुप्तचर सैनिक आणि अधिकाऱ्यांसाठी कुराणचा अभ्यास अनिवार्य केला आहे. याचबरोबर इस्रायली सैनिक आणि हिब्रू बोलणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी अरबी भाषा शिकणे अनिवार्य करण्यात आले असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. याचबरोबर इस्रायल आता आपल्या अभ्यासक्रमात कुराण आणि अरबी भाषा देखील समाविष्ट करणार आहे.
इस्रायली सरकारी वाहिनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2023 मध्ये हमासने इस्रायलवर मोठा हल्ला केला होता. गुप्तचर सेवांच्या चुकीमुळे हा हल्ला झाल्याचे मानले जाते. अहवालात असेही म्हटले आहे की जर लष्करी अधिकारी आणि मोसाद अधिकाऱ्यांना अरबी भाषा येत असती तर हल्ला झाला नसता. म्हणून, आता इस्रायलने आदेश जारी केला आहे की त्यांच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर अरबी भाषा शिकावी लागेल.
समोर आलेल्या माहितीनुसार, इस्रायल सर्व बाजूंनी मुस्लिम देशांनी वेढलेला आहे. इस्रायलचे शेजारी देश जॉर्डन, तुर्की, सौदी अरेबिया, येमेन आणि लेबनॉनसारखे देश आहेत. अरबी भाषिक देशांमध्ये इस्रायल हा एकमेव देश आहे जिथे हिब्रू भाषा बोलली जाते. सध्या इस्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे आणि परिस्थिती अशी आहे की इराण कधीही इस्रायलवर हल्ला करू शकतो.
Delhi Earthquake: मोठी बातमी, दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के
इराणमधील बरेच लोक अरबी देखील बोलतात, म्हणून इस्रायलने आता आपल्या अधिकाऱ्यांवर ही भाषा लादली आहे. इस्रायलच्या सर्वोच्च कमांडरना अरबी भाषेचे ज्ञान आहे, त्यामुळे ते या भाषेचा वापर करून शत्रूच्या अनेक योजना समजतात, परंतु इस्रायलमधील दुसऱ्या दर्जाच्या सैनिकांना अनेक अडचणी येत आहेत, म्हणून आता त्यांच्यासाठी अरबी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे.