इस्रायली सैन्याची मोठी कारवाई, हमासचा गाझा प्रमुख मोहम्मद सिनवार ठार, PM नेतन्याहू यांची घोषणा

Mohammed Sinwar : इस्रायली सैन्याने मोठी कारवाई करत हमासचा गाझा प्रमुख मोहम्मद सिनवारला (Mohammed Sinwar) ठार मारले असल्याची माहिती इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी दिली आहे. इस्रायली सैन्याने खान युनूसमधील (Khan Younis) युरोपियन हॉस्पिटलजवळील असणाऱ्या एका बोगद्यात ही कारवाई केली असल्याची माहिती देखील नेतान्याहू यांनी दिली आहे. खान युनूसमधील युरोपियन हॉस्पिटलजवळील असणाऱ्या एका बोगद्यावर हवाई हल्ला करत मोहम्मद सिनवार याला ठार मारण्यात आले आहे.
या बाबातची माहिती देताना नेतान्याहू म्हणाले की, मोहम्मद सिनवारला ठार मारण्यात आले आहे. सिनवार हमासच्या लष्करी शाखेचे नेतृत्व करत होता. हा हमाससाठी मोठा धक्का आहे मात्र तरीही देखील आमचे ऑपरेशन संपलेले नाही. पुढे देखील हमासविरोधात कठोर कारवाई सुरु राहणार असं नेतान्याहू म्हणाले.
🎯#BREAKING: Prime Minister @netanyahu confirms: Mohammed Sinwar was eliminated. pic.twitter.com/j0HfbZhxnh
— Israel War Room (@IsraelWarRoom) May 28, 2025
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑक्टोबर 204 मध्ये याह्या सिनवार यांच्या मृत्यूनंतर मोहम्मद सिनवारने हमासचे लष्करी आणि राजकीय नेतृत्व हाती घेतले होते. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी देखील खान युनूस येथे झालेल्या हवाई हल्ल्यात मोहम्मद सिनवार ठार झाल्याची पुष्टी केली आहे. तर या हल्ल्यात हमासचा रफाह ब्रिगेड कमांडर मोहम्मद शबाना आणि इतर 10 साथीदारही या हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत हमासने मोहम्मद सिनवारच्या मृत्यूची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही.
IND vs ENG कसोटी मालिका कधी आणि कुठे पाहता येणार? एका क्लीकवर जाणून घ्या सर्वकाही