भारत- पाकिस्तानमध्येच नव्हे तर ‘या’ 4 युद्धांमध्येही डोनाल्ड ट्रम्प यांनी बजावली महत्वाची भूमिका

भारत- पाकिस्तानमध्येच नव्हे तर ‘या’ 4 युद्धांमध्येही डोनाल्ड ट्रम्प यांनी बजावली महत्वाची भूमिका

Donald Trump : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला होता. भारताने या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले होते. यानंतर पाकिस्तानकडून देखील भारतातील अनेक शहरात हवाई हल्ले करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते मात्र भारतीय लष्काराकडून या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. तर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

या बातमीनुसार, भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी केल्याने दोन्ही देशांनी युद्धबंदी वर सहमती दर्शवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी केवळ भारत आणि पाकिस्तान युद्धात नव्हे तर आतापर्यंत 5 युद्धांमध्ये मध्यस्थी करुन तोडगा काढला आहे.

इस्रायल-हमास

मागील 2-3  वर्षांपासून सुरु असलेल्या हमास आणि इस्त्रायल युद्ध बंदीमध्ये देखील आपल्या दुसऱ्या कार्यकाळात महत्त्वाची भूमिका बजावली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या भूमिकेमूळे इस्त्रायलने गाजावर होणारे हल्ले थांबवण्याचा निर्णय घेतला होता.

इराण-इस्रायल

गाजा पट्टीवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे इराण आणि इस्रायलमध्ये देखील संबंध खराब झाले होते. गेल्यावर्षी पुन्हा एकदा एप्रिलमध्ये एकमेकांसमोर आले होते. मात्र अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करुन संभाव्य युद्ध टाळले होते.

रशिया-युक्रेन

दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यात मध्यस्थी करुन युद्धाबंदी वर अनेक करार केले आहे. काही दिवसांपूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात जोरदार वाद पाहायला मिळाला होता मात्र यानंतर झेलेन्स्की यांनी आपली चूक मान्य करत रशियासोबत युद्धविराम वर अनेक करार केले होते.

अमेरिका आणि हुथी

तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेत हुथी बंडखोरांवरील हवाई हल्ले थांबवण्याचा आदेश जारी केले आहे. हुथी बंडखोरांनी अमेरिकन अधिकाऱ्यांना सूचित केले आहे की त्यांना आता लढायचे नाही, ज्याबाबत त्यांनी म्हटले होते की ते हुथी बंडखोरांवर हवाई हल्ले करणार नाहीत.

सुनावणीत अडथळा, राहुल गांधींचा जामीन रद्द करा, सात्यकी सावरकरांची मागणी

भारत आणि पाकिस्तान 

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात 7 मे पासून युद्ध सुरु झाला होता मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करत युद्धबंदी करण्यात यशस्वी झाले. गेल्या चार दिवसांपासून दोन्ही देशांकडून हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली होती मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube