सुनावणीत अडथळा, राहुल गांधींचा जामीन रद्द करा, सात्यकी सावरकरांची मागणी

Rahul Gandhi : लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी दाखल खटल्याच्या सुनावणीला काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) वारंवार तारखा मागत असल्याने त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी सात्यकी सावरकरांच्या वकिलांनी शुक्रवारी 9 मे रोजी न्यायालयात केली.
जामिनाच्या अटींचे उल्लंघन होत असल्याने गांधी यांचा मुचलका जप्त करण्यात यावा, तसेच राहुल गांधी न्यायालयात हजर राहतील हे सुनिश्चित करावे, असेही न्यायालयात सादर केलेल्या अर्जात नमूद करण्यात आले आहे. राहुल गांधी आपली याचिका नोंदविण्यास (प्ली रेकॉर्डिंग) जाणूनबुजून टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे खटल्याच्या सुनावणीत अडथळा निर्माण होत असून, वारंवार तारखा मागत असल्याने खटल्याच्या सुनावणीत अडथळे निर्माण होत आहेत.
खटल्याच्या सुनावणीला स्थगिती मागणार नाही, तसेच खटल्याच्या प्रत्येक तारखेला राहुल यांचे वकील हजर राहतील, या अटींवर न्यायालयाने राहुल गांधींना जामीन मंजूर केला होता. त्या विरोधात सात्यकी सावरकर यांचे वकीलांनी न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर राहुल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद दत्तात्रय पवार हे 28 मे 2025 रोजी आपले म्हणणे मांडणार आहेत.
प्रसिध्द रंगभूषाकार विक्रम गायकवाड निधन; वयाच्या ६१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पुस्तकांसह भाषणाचा पेन ड्राइव्ह गांधींच्या वकिलांकडे सुपूर्त केला असून राहुल गांधी यांच्या वकिलांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित ‘माझी जन्मठेप’ व ‘हिंदुत्व’ या पुस्तकांचे इंग्रजी व मराठी भाषांतर, राहुल गांधी यांचे वादग्रस्त भाषण असलेला पेन ड्राइव्ह न्यायालयात मागितला होता. सात्यकी सावरकर यांच्या वकिलांनी हे साहित्य राहुल गांधी यांच्या वकिलांकडे न्यायालयात सुपूर्त केले आहे. खटल्याची पुढील सुनावणी दिनांक 28 मे 2025 रोजी होणार आहे.