Israel : पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घराबाहेर आंदोलक ; संरक्षण मंत्र्यांची पदावरून हकालपट्टी

  • Written By: Published:
Israel : पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घराबाहेर आंदोलक ; संरक्षण मंत्र्यांची पदावरून हकालपट्टी

इस्रायलमध्ये (Israel) पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांच्या न्यायालयीन सुधारणा विधेयकाच्या विरोधात संपूर्ण इस्रायल रस्त्यावर उतरला आहे. त्यात आता इस्रायलमधील शिक्षक आणि डॉक्टरही काम सोडून आंदोलनात सहभागी झाले आहेत. इस्रायलच्या सर्वात मोठ्या कामगार संघटनेचे प्रमुख इसाक हरझोग यांनी ही माहिती दिली आहे.

त्याचबरोबर इस्रायलच्या तेल अवीव विमानतळावर काम करणारे सर्व लोक नेतान्याहू सरकारच्या विरोधात संपावर गेले आहेत. त्यामुळे विमानांच्या टेक ऑफवर बंदी घालण्यात आली आहे. इस्रायलमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेली निदर्शने सोमवारी पुन्हा तीव्र झाली.

Mallikarjun Kharge : पंतप्रधान मोदी लोकशाही संपवत आहेत; अदाणींची एवढी संपत्ती कशी वाढली?

संरक्षण मंत्र्यांची पदावरून हकालपट्टी

दरम्यान पंतप्रधान नेतान्याहू यांनी रविवारी संरक्षण मंत्री योव गॅलेंट यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. देशाची न्यायव्यवस्था कमकुवत करण्यासाठी आणलेल्या विधेयकामुळे लष्करातही फूट पडत आहे, असे वक्तव्य योव यांनी शनिवारी एका टीव्ही कार्यक्रमात म्हटले होते. त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

पण केवळ सामान्य जनताच नाही तर उच्च पदांवरील पोलीस अधिकारी आणि व्यावसायिकही सरकारच्या निर्णयाला विरोध करत आहेत. काही दिवसापूर्वी १२ मार्च रोजी तेल अवीवचे पोलीस प्रमुख एमिशाई अशेद यांनी आंदोलनात सहभागी होऊन सरकारला धक्का दिला होता. आशेद आंदोलनात सामील होण्यासाठी पोहोचताच टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र, त्यानंतर त्यांना पदावरून हटवून त्यांची बदली करण्यात आली आहे.

पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घराबाहेर आंदोलक

दुसरीकडे रविवारी लाखो आंदोलक इस्रायलमध्ये रस्त्यावर उतरले आणि नेतान्याहू सरकारचं वादग्रस्त विधेयक मागे घेण्याची मागणी केली. निदर्शनादरम्यान लोकांनी इस्रायलची राजधानी तेल अवीवचा मुख्य रस्ता रोखून धरला.

सोबत इस्रायलच्या लोकांनी रविवारी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या खाजगी घराबाहेर जोरदार निदर्शने केली. या लोकांशी पोलिसांची झटापट झाली. अनेकांनी महामार्गावर जाळपोळही केली.

आज होणार निर्णय

आज नेतान्याहू इस्रायलच्या परिस्थितीवर सत्ताधारी आघाडीतील सर्व पक्षांशी चर्चा करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार ही बैठक महत्त्वाची असेल. कारण त्यातून सरकारची भूमिका स्पष्ट होईल.

Zuckerberg Became Father : मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांना तिसऱ्यांदा कन्यारत्न

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube