मोठी बातमी! बॉम्बस्फोटांनी इस्रायल हादरले, बसेसमध्ये एकामागून एक स्फोट

  • Written By: Published:
मोठी बातमी! बॉम्बस्फोटांनी इस्रायल हादरले, बसेसमध्ये एकामागून एक स्फोट

Israel Buses Blast Update :  गुरुवारी रात्री इस्रायलच्या (Israel) बात याम (Bat Yam) भागात बसेसमध्ये एकामागून एक स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस संभाव्य दहशतवादी हल्ला (Buses Blast) म्हणून याचा तपास करत आहे. माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र तरीही या स्फोटानंतर अधिकाऱ्यांनी जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

हा संशयित दहशतवादी हल्ला असल्याचे दिसून येते. बात याममधील वेगवेगळ्या ठिकाणी बसेसमध्ये अनेक स्फोट झाले आहे असं पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे. हमासने (Hamas) गाझामधून चार इस्रायली बंधकांचे मृतदेह परत केले तेव्हा ही घटना घडली असल्याचं सांगण्यात येत आहे.

चॅनल 13 टीव्हीनुसार, पाचही बॉम्बमध्ये समानता होती, या बसेसमध्ये टाईमिंग डिव्हाईस देखील ठेवण्यात आले होते असं पोलिस प्रवक्ते असी अहारोनी (Asi Aharoni) म्हणाले. तर दुसरीकडे बस स्फोटांनंतर इस्रायलमध्ये बसेस आणि ट्रेन चेक  करण्याचे काम बॉम्ब स्क्वॉड करत आहे. तर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळे पथक तयार केले आहे.

याबाबत पोलिस प्रवक्ते हैम सरग्रोफ (Haim Sargrof) यांनी सांगितले की, एकाच व्यक्तीने बसेसमध्ये बॉम्ब ठेवले की या घटनेमध्ये आणखी काही लोकांचा सहभाग होता याबाबत तापास करण्यात येत आहे.  तर बात यामच्या महापौर त्झिव्का ब्रोट म्हणाल्या की, बसेस रिकाम्या होत्या आणि पार्किंगमध्ये उभ्या होत्या, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. बॉम्ब स्क्वॉड काम करत आहे.

चार वर्षांपूर्वी लग्न अन् आता युजवेंद्र चहल – धनश्री वर्माचा घटस्फोट, धनश्रीला मिळणार 60 कोटींची पोटगी ?

तर दुसरीकडे  बसेसवर झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी सुरक्षा बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. नेतान्याहू यांना त्यांच्या लष्करी सचिवांकडून या स्फोटांबद्दल सतत अपडेट मिळत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube