युद्ध थांबलं! इस्त्रायल अन् हिजबुल्लामध्ये युद्धविरामाची होणार घोषणा; नेमकं काय घडलं?

युद्ध थांबलं! इस्त्रायल अन् हिजबुल्लामध्ये युद्धविरामाची होणार घोषणा; नेमकं काय घडलं?

Israel ceasefire deal with Lebanon : मध्य पूर्वेतील इस्त्रायल आणि हिजबुल्लामध्ये सुरू (Israel Lebanon War) असलेला संघर्ष आता थांबण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. इस्त्रायलच्या सुरक्षा कॅबिनेटमध्ये इराण समर्थित हिजबुल्लाबरोबर युद्धविरामाला मंजुरी (Ceasefire) दिली आहे. यामुळे लेबनॉन विरुद्ध काही महिन्यांपासून सुरू असलेलं युद्ध संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिका आणि फ्रान्सने यामध्ये मध्यस्थी केली. त्यानंतर इस्त्रायल आणि हिजबुल्ला या दोघांनीही युद्धविरामास सहमती दर्शवली.

या युद्धविरामाची घोषणा लवकरच होणार आहे. यानंतर इस्त्रायली सैनिक दक्षिण लेबनॉनमधून (Lebanon War) माघार घेतील. तसेच लेबनॉन या ठिकाणी पाच हजार सैनिक तैनात करणार आहे. तर हिजबुल्ला लिटानी नदीच्या दक्षिणेपर्यंत आपली उपस्थिती समाप्त करील असे ठरले आहे. इस्त्रायल आणि लेबनॉनमधील युद्धात आतापर्यंत 3800 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सोळा हजारांपेक्षा जास्त जखमी झाले आहेत.

या युद्धात लेबनॉनचं मोठं नुकसान झालं आहे. अमेरिकेने मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी (Jo Biden) हा करार मध्य पूर्वेतील शांततेसाठी अतिशय महत्वाचा आहे असे स्पष्ट केले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांनीही हा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले, हा करार लागू राहिल. परंतु, याचं थोडं जरी उल्लंघन झालं तर त्यावर अतिशय कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल. इस्त्रायल आपल्या सर्व उद्दीष्टांची पूर्तता करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. यामध्ये गाझातील धोका पूर्णपणे संपवणे आणि अपहरण झालेल्या इस्त्रायली नागरिकांची सुटका करणे या गोष्टींचा समावेश आहे.

Iran Israel War : मोठी बातमी! युद्ध भडकले, इराणचा इस्रायलवर मिसाईल हल्ला

युद्धविराम जाहीर होण्याआधी इस्त्रायलने लेबनॉनवर जोरदार हल्ले केले. बेरुत शहरातील एका मोठ्या इमारतीवर हवाई हल्ला करण्यात आला. या घटनेत जवळपास 29 लोकांचा मृत्यू झाला होता. यानंतर युद्ध थांबवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले होते. अखेर या प्रयत्नांना यश मिळालं आहे. युद्धविराम करण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवण्यात आली आहे. या घोषणेनंतर इस्त्रायलकडून होणारे हल्ले थांबतील. मात्र हा युद्धविराम किती दिवस लागू राहील याचा अंदाज सध्या व्यक्त करता येणे कठीण असल्याचे सांगण्यात येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube