Bholaa Box Office Collection: अजयच्या ‘भोला’ची छप्परफाड कमाई, सहा दिवसांत ‘इतक्या’ कोटींची उलाढाल

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 31T104725.081

Ajay Devgn Bholaa Box Office Collection Day 6 : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि तब्बूचा ‘भोला’ (Bholaa) हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. (Ajay Devgn Bholaa Box Office Collection Day 6) ३० मार्चला हा प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने रिलीजच्या ६ दिवसांत ५० कोटींचा टप्पा पार केला आहे.

‘भोला’ हा सिनेमा सिंघमच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे या सिनेमाला सिनेरसिकांनी मात्र मोठी पसंती दर्शवली नाही. ‘भोला’च्या निर्मात्यांच्या सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत. पण ५ दिवसामध्ये या सिनेमाने फक्त ४८.७८ कोटींची कमाई या सिनेमाने केली आहे. तर सहाव्या दिवशी या सिनेमाने ४.५० कोटींची कमाई केली. आतापर्यंत या सिनेमाने ५३.२८ कोटींचा गल्ला कमविला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)


‘भोला’ची वाटलाच 100 कोटींच्या दिशेने

अजय देवगणच्या ‘भोला’ या सिनेमाने रिलीजच्या ६ दिवशीच ५० कोटींची कमाई केली असली तरी लवकरच हा सिनेमा १०० कोटींचा टप्पा पार करणार असे सांगितले जात आहे. लवकरच हा सिनेमा १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार असल्याचे सांगितले जात आहे. ‘भोला’ या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत असण्याबरोबरच अजयने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली आहे.

‘बलोच’मध्ये दिसणार मराठ्यांची शौर्यगाथा, प्रवीण तरडेंच्या मोशन पोस्टरने वेधले लक्ष

मिळालेल्या माहितीनुसार, अजयने दिग्दर्शित केलेला एकही सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला नाही. यामुळे आता अजय आणि तब्बूचा ‘भोला’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ‘भोला’ हा सिनेमा ‘कैथी’ या दाक्षिणात्य सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. लोकेश कनगराजने त्यावेळी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती.

आता ‘भोला’ या सिनेमात अजय देवगण, तब्बूसह संजय मिश्रा, गजराव राव, मकरंद देशपांडे, किरण कुमार आणि दीपक डोबरियाल महत्त्वाच्या भूमिकेत राहिले आहेत. याअगोदर त्याने ‘यू मी और हम’, ‘शिवाय’ आणि ‘रनवे 34’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. भोला हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झालेल्या कॅथी या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तेव्हा लोकेश कनगराज यांनी केलं होतं. अजयच्या ‘दृष्यम-2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आता त्याचा भोला हा चित्रपट 50 कोटींच्या क्लबमध्ये शामिल होईल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच चाहत्यांना मिळणार आहे.

Tags

follow us